कामशेत शहरातील मध्यवस्तीत पार्किंग व्यवस्था नाही. त्यातच अतिक्रमणे वाढली आहेत. यामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी होत आहे. याची दखल घेत भूमिअभिलेख आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने जागा मोजणी करून अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय घेतला आहे.पंचक्रोशीत कामशेत शहराची बाजारपेठ सर्वांत मोठी समजली जाते. परिसरातील उत्पादित शेतमाल येथील बाजारपेठेत येतो. प्रामुख्याने आंबेमोहर, इंदायणी तांदूळ खरेदीसाठी येथे अन्य शहरांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात. याची सुमारे शंभर दुकाने आहेत. लग्नसराईच्या काळात येथे ग्राहकांची मोठी गर्दी असते.मात्र होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.याबाबतची सद्यस्थिती जाणून घेत वृत्त प्रसिद्ध झाले होते.त्यावर शासकीय जमिनींची मोजणी करून अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय प्रशासनांनी घेतला आहे.येथील जमीन मोजणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने काही महिन्यांपूर्वी चेक दिला होता. काही कारणांमुळे तो वटला नव्हता. त्यामुळे ही प्रक्रिया रखडली होती. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बांधकाम खात्याने मोजणीची रक्कम भूमिअभिलेख विभागाच्या खात्यात जमा केली. त्यामुळे अडचण दूरझाली आहे. दरम्यान,
"सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय जागा मोजणीसाठीची रक्कम जमा केलीआहे. एप्रिलमध्ये मोजणीनंतर हद्दी निश्चित केल्या जातील,” अशी माहिती सर्वेअर सागर धादवड यांनी दिली.
"कामशेत शहरातील शासकीय जागेच्या हद्दी भूमिअभिलेख खात्याकडून एप्रिलमध्ये निश्चित केल्या जातील.त्यानंतर शासकीय जागेवर अतिक्रमण आढळल्यास ते पोलिस बंदोबस्त त्वरित काढण्यात येणारआहे."
- धनंजय दराडे, उपअभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग


