मुख्य संपादक : संतोष पांढरे
" शिका संघटीत व्हा ,संघर्ष करा " मुलमंत्र
डॉ बाबासाहेब आधुनिक भारताचे जनक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदामंत्री, लेखक, वकिल, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहासकार, मानववंशशास्त्र, पाली, बौध्द, संस्कृत, हिंदी साहित्यांचे अभ्यासक, राजनितीतज्ञ, विज्ञानवादी, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पुरसकर्ते, शेतकरी कष्टकरी, कामगार मानवी हक्काचे दिन दलीतांचे, शोषीतांचे कैवारी, स्त्री शक्तीचे उध्दारक अशा महामानवाची १३४ वी जयंती निमित्त संपूर्ण देश त्यांचे स्मरण करत आहे.
डॉ. बाबासाहेबाची १३४ वी जयंती देशभरात आनंद उत्सावात साजरी केली जाते. बाबासाहेबाच्या जयंती उत्सावाच्या माध्यामातून भारत देशासाठी, दिन दलीत, बहुजन समाजासाठी केलेला संघर्ष खडतळ प्रवास केलेला त्याग, संघर्ष समाजासाठी दिलेली आहूती कायम भारतीय बंधू/बघीणीच्या स्मरणात राहिल बाबासाहेबांच्या जयंती निमित्त मी माझ्या लेखनेतून बाबासाहेबाची यशोगाथा मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
भिमराव आंबेडकर यांचे पूर्वजांचे मुळ गाव महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्हयातील मंडणगड तालुक्यातील आंबवडेकर हे मुळ गाव तेथील सकपाळ घराणे म्हणून प्रसिद्ध होते. भिमरावाचे आजोबा मालोजी सकपाळ ब्रिटीश सैन्यात नौकरी करत होते. मालोजी सैन्यात असल्याने मालोजी सकपाळ यांनी रामजींना चांगले शिक्षण देवून पुढे त्यांनाही सैन्यात घेण्यात आले. त्या सैन्यांमध्ये मेजर असलेले धर्मा (मुरबाडकर ) यांचा रामजी सपकाळ यांच्याशी परीचय झाला. मेजर धर्मा मुरबाडकर यांनी आपल्या मुलीचा विवाह रामजी सपकाळ यांच्याशी करुन दिले. १८६७ मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे हा विवाह संपन्न झाला. रामजी सपकाळ व भिमाबाई यांच्या पोटी अनेक पिढ्यानंतर महामानवाचा जन्म् झाला. १४ एप्रिल १८९१ मध्ये मध्यप्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या "महु " या गावात रामजी व भिमा माईच्या पोटी पुत्ररत्नाचा जन्म झाला. बाळाचे नामकरण "भिमराव "असे ठेवण्यात आले. भिमराव ६ वर्षाचे असताना भिमाबाईचे निधन झाले. माईचे छत्र हरपले कालांतराने रामजी बाबा सैन्यातून सेवानिवृत्त झाले. रामजीबाबाने आपला परिवार घेवून दापोली येथे स्थायीक झाले. भिमरावाच्या आत्या सोबत परिवारात राहू लागले. भिमरावांच्या परिवारामध्ये भिमरावाला "भिवा " म्हणून संबोधित असे. रामजीबाबा कोरगावी असताना त्यांना भेटायला गेलेल्या भिमरावांना अस्पृश्यतेचा पहिला अनुभव आला. भिमरावांचे शिक्षण सातारा येथे ७ नोव्हेंबर १९०० रोजी सरकारी हायस्कूल मध्ये (आजचे प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये प्रवेश मिळाला. रामजी बाबा रात्री दिवा बत्तीवर " भिवा " चा अभ्यास घेत आपण ही भिवा सोबत जागे राहावे भोजन करताना सर्व प्रथम भिवाना जेवून देऊन जेवन होई पर्यंत वाट बघत बसायचे असे बरेच दिवस भिवाने अनुभवले एक दिवस भीवा म्हणाले बाबा माझ्या सोबत आपण जेवत का ? नाही आज पासून मी कमी जेवन करेन तुम्हाला ही भाकर जास्त ठेवेन तेव्हा रामजी बाबा म्हणतात भिवा माझी भूक या टोपल्यातील भाकरीने नाही भरणार हो माझी भूक तुम्ही आहात तुम्ही इतके मोठे व्हा ! इतके विद्यवान व्हा की , पिढ्यान - पिढ्याने जे आम्ही सोसलं ते पुढच्या पिढी ने सोसू नये ज्या शाळेत प्रवेश घेतला तेथे कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक आध्यापनाचे कार्य करत होते . शालेय जिवनापासून अस्पृश्यता म्हणजे काय? हे तीव्र धक्का बसलेला होता. शाळेत हजेरी पठाला सपकाळ ऐवजी आंबेवडेकर गावाच्या नावावरून अडनाव लावण्यात आले मात्र, हे अडनाव कायम न राहता आंबेडकर असे नमुद करण्यात आले. पुढे बाबासाहेब रामजी आंबेडकर या नावाने ओळखू लागले. शालेय जीवनात असताना दापोली जवळच्या वानंद गावातील भिकु धोत्रे (वलंगकर) यांच्या मुलीशी म्हणजे रमाई यांचा विवाह ४ एप्रिल १९०६ रोजी मुंबई येथील बायखळा येथील भाजी मार्केट मध्ये भिमराव व रमाईचा विवाह संपन्न झाला. शालेय जीवनातून व बाहेरील समाजात वावरताना अस्पृश्यतेचे दररोज नवीन नवीन अनुभव येत असे. जाती व्यवस्थेतीचे उतरंड निर्माण झाली होती. शुद्राने शिक्षण घेवून नये, सुरक्षा व्यवस्थेमध्ये स्थान मागू नये. शेती कसू नये, व्यापार करू नये, उच्चवर्णीयांना स्पर्श करू नये, उच्चवर्णीयांनी जे काम सांगितले तेच काम मर्यादित राहून करावे. त्यांच्याविरुद्ध बोलायचे म्हटले की, अंगावर संकट ओढून घेणे, अशी परिस्थिती वर्ण व्यवस्थेने त्या काळी करून ठेवली होती. स्त्रीयांची अवस्था खूपच बिकट होती. बाबासाहेब ही परिस्थिती डोळ्यांनी पाहत होते व अनुभवत होते. बहुजन समाजाचे जीवन जगणे म्हणजे गुलामगिरीमध्ये पिढ्यांनपिढ्या चालत येत होत्या ही परिस्थिती पाहून बाबासाहेबांनी जिद्दीनी , धाडसाने या जातीप्रथेला न जुमानता शिक्षण घेवू लागले. मनात एकच ध्यास ही जात उतरंड नाहीशी करणे व आपण एकाच देवाचे मुलं आहोत हे परिवर्तन घडवून आणायचे असेल तर एकमेव शस्त्र म्हणजे " शिक्षण " होय.
हवा वेगाने होती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता,
अन्यायाच्या विरूद्ध लडण्याचा इरादा त्यांच नेक होता.
असा रामजीबाबाचा लेक होता.
भिमराव आंबेडकर लाखात नाहीतर तर जगात एक होता.....
सन १९०७ साली बाबासाहेब एलिफन्स्टन हायस्कूल मधून मॅट्रीक परीक्षा उतीर्ण झाले. हा उत्सव साजरा करण्यासाठी भिमराव रामजी आंबेडकरांचे कौतुक करण्यासाठी कृष्णाजी अर्जुन केळूसकर गुरूजी यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरवण्यात आली. भिमाचे सर्वाने कौतुक केले. प्रेरणा प्रोत्साहन दिले. त्या प्रसंगी केळूसकर गुरुजींने स्वत: लिहिलेले मराठी "बौद्ध " चरित्र्याचे एक प्रत भिमरावाला भेट दिली. भिमरावांच्या हातात हे पुस्तक येणे म्हणजे आयुष्याला पूर्ण कलाटणी म्हणावे लागले. तेव्हापासून भिमराव बुद्ध प्रती आकर्षित झाले. अस्पृश्यता आणि असमानतेची वागणूक सहन केल्यानंतर भिमरावानी लहान वयातच भारतीय समाजातून या वाईट रुढी परंपरेचे उच्छाटन करण्याचा निर्णय केला होता. पण आर्थिक अडचणीमुळे रामजीबाबा भिमरावाना महाविद्यालयीन शिक्षण देवू शकतील अशी परिस्थिती नव्हती. हे सर्व केळूसकर गुरुजींनी जानले होते.मुंबई मध्ये महाराज सयाजी गायकवाड यांच्याशी भिमरावाची भेट घालून दिली. भिमरावाची हुशारी, जिद्द, चिकाटी, मेहनत पाहून पुढील शिक्षण घेण्यासाठी दर महा २५ रु शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. पुढे सन १९१२ मध्ये भिमाने मुंबई विद्यापिठातून बी. ए. पदवी संपादन केली. व बडोदा संस्थानात नौकरी साठी रुजू झाले. सर्व सुरळीत सुरु असताना २ फेब्रुवारी १९१३ मध्ये भिमरावाचे वडील रामजी बाबाचे निधन झाले. घरावर दु:खाचा डोंगर पसरला या दु:खातून सावरताना काही काळ गेला. त्यानंतर भिमराव नोकरी सोडून उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेतील कोलंबीया विद्यापीठात गेले. बाबासाहेब परदेशातून पी.एच.डी. पदवी मिळवणारे पहीले भारतीय होते. तसेच दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट पी.एच.डी. व डी.एस.सी. पदव्या मिळवणारे पहिले आशियायी होते. डॉ.बाबासाहेबावर बोलायला , लिहायला , विचार करायला जगातील तमाम विद्यवान एकत्र आले तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यवतेची बरोबरी होऊ शकत नाही , म्हणून कोल्हापूरचे लोकराजे छं शाहुमहाराज स्वतः मुंबई येथील डॉ बाबासाहेबाच्या राहात्या घरी भेट देऊन जरी पट्ट्याचा फेटा बांधुन आपण " ज्ञानयाचा राजा आहोत " असे गौरव करुण सन्मान करतात .
माता रमाई, माझ्या भिमाची सावली
दिन - दलितांची आई , अशी भाग्यशाली त्यागमुर्ती
माझी आई - माता रमाई, भिमाची बनुन सावली .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मातारमाई यांच्या पोटी पाच आपत्ये जन्मास आले होते. त्यापैकी, पहिले यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी ) व राजरत्न असे पाच आपत्यापैकी बाबासाहेबांचे एकच आपत्ये वारस म्हणून " यशवंत " राहिले. इतर चार आपत्ये बालवयातच वेळेवर उपचार न मिळाल्याने स्वर्गवाशी झाले.
तो प्रसंग डॉ.बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी इग्लंडला होते. ज्या ठिकाणी अभ्यास करत होते ते ठिकाण राहत्या घरापासून १५ ते १६ किमीचा अंतर चालत जावून त्या ठिकाणी अभ्यास करत असे.बाबासाहेब कठीण परिस्थितीमध्ये दिवस काढत होते की, स्वत:साठी एक आणा सुद्धा स्वत: साठी खर्चू शकत नव्हते. अशा प्रसंगी माता रमाईची तार भारतातून इग्लंडला पाठवण्यात आली. तार बाबासाहेबांना मिळाली. त्या तारेत लिहिले होते की, साहेब गंगाधर फारच आजारी पडला आहे. दवा पाणी करण्यासाठी पैश्यांची गरज भासते आपणाकडून काही तरतुद झाली तर बर होईल. साहेबांनी तार वाचले, डोळ्यांत पाणी आले. परत साहेबांनी तार मातारमाई ला पाठवले. रमू गंगाधरला आपणांस सोडून जायचे असेल तर जावू दे माता रमाई ही ताराचा संदेश ऐकताच तिचे डोळे भरून आले. काय करावे काही सुचेना आश्या प्रसंगी बाबासाहेब तिकडे पावाच्या तुकडयावर दिवस काढत होते. गंगाधराने इकडे जगाचा निरोप घेतला होता. माता रमाईच्या लक्षात आले की, आपले साहेब पण लई अडचणीत हायतं आपण साहेबाला या पुढे आपला त्रास होईल असं काही मागायचं नाही म्हणून रमाई पहाटे लवकर उठून जनावरांचे शेण गोळा करणे, त्यांच्या गवऱ्या थापणे व ते बाजारात जावून विकू लागल्या. संसारात काटकसर करुन माता रमाई साहेबांच्या शिक्षणासाठी पैसे पाठवू लागल्या. गरीबी जरी त्या संसारात होती. रमाईची भिमाला साथ होती.भिमराव होते दिव्याच्या समान अन त्या दिव्याची मातारमाई वात होती.
कालंतराने असाच दुसरा प्रसंग
रमेश हा तापाने फणफणू लागला होता, साहेबाना निरोप मिळाला. साहेब भारतात येण्यासाठी निघाले साहेब भारतात पोहचताच तोपर्यंत इकडे रमेशने जगाचा निरोप घेतला. साहेब घरी पोहचले दोन्ही हातावर बाळ रमेशला घेवून आपल्या ह्दयाशी घट्ट पकडून हांबरडा फोडला. असहाय्य वेदना मनाला झाल्या. शेवटी जो जग सोडून जातो त्यांची मुठ माती करावी लागते. म्हणून एक व्यक्ती जवळ येवून मुठ मातीसाठी कफनसाठी पैसे लागतील साहेब म्हणाले तेव्हा साहेबांनी खिश्यात हात घातला, पण खिश्यात एक दमडीही हाताला लागली नव्हती. जवळच्या सहकाऱ्यांने साहेबांचे दु:ख ओळखले. सर्वाच्या सहकार्याने मदतीने बाळ रमेशची मुठमाती केली. बाबासाहेबांना वेदना सहन झाल्या नाहीत. साहेब रात्री एका कोपऱ्यात जावून ढसाढसा रडू लागले. आता मला यापेक्षा ही वेदना जास्त सहन होणार नाहीत. मी आणि माझ्या रमुनी खूप वेदना सहन केल्या. पण आता या समाजकारणामुळे जर मी माझ्या मुलाबाळाला रमुला सांभाळू शकत नाही. तर असली समाजसेवा काय कामाची, बस झाले आता खूप सोसलं. असे बोल ऐकताच माता रमाई साहेबाजवळ आली. साहेब आपलं दु:ख कळतं हो मला पण आपण आतापर्यत खूप वेदना सहन केलात खूप कष्ट केलात. आपण मला दिलेले वचन मोडणार का ? हो साहेब. आपणच म्हणालात ना भारत देशासाठी , समाजासाठी मी सर्वस्व पणाला लावेन. समाजात परिवर्तन घडवून आणेन. आता मागे हाटू नका, आपला एक रमेश गेला साहेब सात कोटी रमेश तुमची वाट बघतात. मी तुमच्यासाठी जीवाचे रान करीन. पण हाती घेतलेले काम आता थांबवू नका. असे रमाई रडत रडत म्हणू लागल्या.
“त्यागालाही वाटावे लाज असा माई तुझा त्याग.
तुझ्या त्यागानेच निर्माण झाला आम्हा लेकरांचा अभिमान... .
बाबासाहेबांनी नोव्हेंबर १८९६ ते नोंव्हेबंर १९२३ अश्या २७ वर्षामध्ये मुंबई विद्यापीठ कोलंबिया विद्यायापीठ, लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थेमधून उच्च शिक्षण घेणारे पहिले भारतीय विदयार्थी होते. डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना ३२ पदव्या प्राप्त करणारे जगातील विधवान यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर होते. तसेच ९ भाषेचे ज्ञान आर्जित केले होते. एकूण् २२ ग्रथ पुस्तिका १० शोधनिबंध आणि लेख परीक्षणे हा एवढा संग्रह बाबासाहेबांच्या इंग्रजी लेखनाचा आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तका पैकी दोन पुस्तके प्रसिध्द आहे .१ प्रॅाब्लेम ऑफ द रुपी २. ऑन्हिलेशन ऑफ कास्ट हे दोन पुस्तके प्रसिध्द दोन्ही पुस्तके भारताच्या आर्थव्यवस्थेवर आधारित आहेत आणि सामाजिक रचनेवर आधारित जगातील पहिले विधवान डॉ बाबासाहेब आंबेडकर , तत्वज्ञानी समाज सुधारक आर्थशास्त्रज्ञ व विज्ञानवादी होते. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर बॅरीस्टरची डीग्री घेऊन भारतात आले त्यावेळी प्रचंड समुदाय साहेबांच्या स्वागतासाठी वाट पाहात होता.बाबासाहेबांची जहाज बंदरावर पोहचली जहाजातून साहेब खाली उतरताच साहेबांचा जल्लोष आनंद उत्सव सुरु झाला.साहेबांवर शुभेच्छा चा वर्षाव सुरु होता कोणी हार तुरा देऊण साहेबांचे स्वागत करीत होते.माता रमाईच्या ही मनात आले की, आपण ही साहेबांना डोळे भरुन पाहावे त्यांचे स्वागत करावे पण आपण जाणार कसं अंगावर फाटकी तुटकी साडी तेही जागो –जागी ठीगळ सुयी दो-यांनी जागो जागी टाके घातलेली तेही धड नको आपले साहेब तर मोठ्ठे बॅरीस्टर होऊन आलेत आणि साहेबांची पत्नी अशा पोशाखात गेले तर तेथील लोक काय म्हणतील साहेबांना काय वाटेल पण जाण्याची इच्छा तर तीव्र झालेली साहेबांना कधी एकदा डोळे भरुन बघावे हीच मनो-मनी इच्छा काय करावे विचार केला घरात नजर फिरवली नजरेत संधुक (पेटी )दिसली पेटी उघडल्या त्या पेटी मध्ये राज्यश्री शाहू महाराजाने मुंबई येथे राहात्या घरी भेट देऊन साहेबांचा सत्कार केला होता व जरी पटयाचा फेटा बांधून स्वागत केले होते .तोच फेटा माता रमाईने काढून त्या फेटयाचे साडी नेसून साहेबांच्या स्वागतासाठी माता रमाई बंदरा जवळ गेली. तेथे साहेबांना डोळे भरुन पाहात एका झाडाच्या आड उभी होती साहेब लोकांना उपदेश करत होते शिक्षणाचे महत्व पटवून देत असताना अचानक पणे नजर त्या झाडाखाली गेली माता रमाई साहेबांचे उपदेश एैकण्यात मग्न होती साहेबांच्या नजरेत माता रमाई दिसताच साहेबांच्या डोळयात पटकन पाणी आले.डोळे ओले चिंब झाले कसे बसे सावरत साहेबांनी स्वत:ला सावरत लोकांना संबोधीत केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलित , शोषित , पिढीत , बहुजन समाजातील घटकांना न्याय , हक्क मिळवून देण्यासाठी चळवळ उभारली त्यात अश्पृश्यता च्या विरुद्ध लढणे , सामाजिक समानता आणि शिक्षणाचे महत्व यावर भर देण्यात आले . बहुजन समाजांना संदेश दिला की ,
" शिका संघटीत व्हा ,संघर्ष करा " हा मूलमंत्र बहुजन समांजाना देऊन कोमजलेल्या विचारांना एक उत्साह, प्रेरणा दिली . जो आपला इतिहास विसरतो तो जीवनात परिवर्तन कधी आणू शकत नाही . अन्यायविरुद्द लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे , हे सर्व अंगी येण्यासाठी " शिक्षण "च शस्त्र आहे . याची जाणिव करुन दिले .समता , स्वातंत्र्य , बंधुभाव, न्याय , धम्म , लोकशाही , अंहिसा , सत्य , मानवता, विज्ञानवाद , संविधान हे बाबासाहेबाचे तत्व या प्रेरणेणे बाबासाहेबांचे दिवसेन - दिवस अनुयायी जोडली जात होते . या अनुयायी मधील एक कट्टर अनुयायी म्हणजे " बाबू दरदास" हे स्वातंत्र्य पूर्व भारतातील दलित राजकारणी , समाज सुधारक होते . " जय भीमचा नारा " सर्वप्रथम बाबू हरदास यांनी दिले जय भीम म्हणजे " बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो " या जय घोषाने बहुजन समाजामध्ये नवचैतन्य निर्माण होते स्फुर्ती मिळते .देशात शांतता ,सुव्यवस्था आणि समानतेने देश,राज्य चालवण्यासाठी राज्यघटनेची गरज भासू लागली.जी भारतीय राज्यघटना," संविधान " म्हणून ओळखली जाते.हे संविधान देशाचा सर्वोच्च कायदेशीर दस्तऐवज असून राज्यकारभाराची चौकट , अधिकार , हक्क , आणि कर्तव्ये निश्चित केले.संविधानाने भारत देशाला एक सार्वभौम , समाजवादी ,धर्मनिरपेक्ष , लोकशाही, प्रजासत्ताक म्हणून स्थापित केले आहे .
" जगातील सर्वात मोठी भारत देशाची लिखित " संविधान " म्हणून ओळखले जाते . डॉ बाबासाहेब आंबेडकर जे मसुदा समितीचे अध्यक्ष तर पंडित जवाहरलाल नेहरु , सरदार वल्लभभाई पटेल , मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ राजेंद्र प्रसाद, बी एन राव, गोपाल स्वामी आयगार , हंसा मेहता असे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान निर्माण झाले . याची सर्वस्व जबाबदारी डॉ बाबासाहेब अंबेडकर यांच्या वर होती .९ डिसेंबर १९४६ रोजी समितीच्या सदस्याची पहिली बैठक संपन्न झाल्यानंतर २ वर्ष ११ महिने १८ दिवसाच्या कठोर परिश्रमाने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा मसुदा डॉ बाबासाहेबांनी तयार केले . व २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना अंमलात आली .
" दलितांची तलवार होऊन गेले
अन्याविरुद्ध प्रहार होऊन गेले
ते एक गरीबच पण
या जगाचा " कोहिनूर " होऊन गेले
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
भारताचे संविधान लिहून गेले . ...
अशा महान विश्वरत्नाला ३१ मार्च १९९० रोजी " भारतरत्न " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
" नमन त्या पराक्रमाला , नमन त्या देश प्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला , नमन त्या महापुरुषाला
नमन अशा विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब रामजी आंबेडकरांना नव्हतेच बाबा कुण्या एका जातीचे
बुद्धीमान पुत्र ते या भारत मातेचे "
सन २०२४ मध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाला 300 वर्षे पूर्ण झाली होती त्या निमित्ताने एवढ्या वर्षात या विद्या पीठातून कोण -कोण विद्यार्थी शिकून गेले यांची यादी बनवण्यात आली यामध्ये शास्त्रज्ञ, विचारवंत अनेक देशाचे राष्ट्र अध्यक्ष विविध क्षेत्रातील विद्यार्थीची यादी भली - मोठी तयार झाली ती यादी कमी करत - करत १० दहा नावाची यादी पटलावर ठेवण्यात आले त्या दहा नावातून परत एकदा विचारवंत शोधले गेले तर त्या यादी मध्ये पहिल्या क्रमांकावर विश्वरत्न भारतत्न बोधिसत्व महामानव डॉ . बाबासाहेब रामजी आंबेडकर यांचे नाव होते . कोलंबिया विद्यापीठाने त्याच प्रांगणात ३५ फुटी पुतळा उभा केला गेला त्या पुतळ्याच्या खाली लिहिले गेले की ,( Symbol Of the Knowledge Dr. B.R. Ambedkar)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सदैव म्हणत की,
प्रथमतः आणि अंततः मी भारतीय आहे .
" सजली सारी , नगरी तुमची पाहण्या कीर्ती
आज आहे बाबासाहेबांची जयंती
आमच्या नसा - नसात भरली स्फुर्ती."
अशा महा पुरुषाच्या जयंती निमित सर्व भारतीय बंधु / भगिनीना हार्दिक शुभेच्छा
लेखक - प्रशांत अडसुळे
मो . नं . 9373623692
(राजमाता अहिल्यादेवी बहुउद्देशीय सामाजिक संस्था कानेगांव ता. लोहारा जि.धाराशिव )



