Breaking

Friday, March 21, 2025

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्ष व श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जयंती निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय संचलित पुण्यात ऐतिहासिक महानाट्य



पुणे-मावळ प्रतिनिधी - मंगेश आखाडे :

बहुचर्चित अशा पुण्यश्लोक महानाट्याचा प्रयोग रविवार दि. 23 मार्च रोजी दुपारी १२ वाजता भरत नाट्यमंदिर सदाशिव पेठ पुणे येथे होणार आहे.श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जयंती व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष निमित्ताने या प्रयोगाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

सदर कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती नामदार प्रा. राम शिंदे, सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री मा. ना. ॲड.आशिषजी शेलार, उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकात दादा पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, होळकर घराण्याचे वंशज महाराज यशवंतराव होळकर ( तृतीय), यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महानाट्य ची संकल्पना सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री मा. ना. ॲड.आशिषजी शेलार यांची असून मा. विकास खारगे, ( भा.प्र.से.) मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव, यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

तरी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन  बिभीषण चवरे  संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई  यांनी केले आहे.