Breaking

Wednesday, April 9, 2025

विश्व नवकार महामंत्र दिवस महाराष्ट्रातील प्रथम चतुर्मुख श्री 1008 मुनीसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर,मोडनिंब येथे साजरा


मुख्य संपादक : संतोष पांढरे

विश्व नवकार महामंत्र दिवस महाराष्ट्रातील प्रथम चतुर्मुख श्री 1008 मुनीसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर,मोडनिंब येथे साजरा करण्यात आला.सकल जैन समाज,मोडनिंब सामूहिक संगीतमय नवकार मंत्र पठणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या दिवशी सकाळी 7 वाजता भगवंताचा अभिषेक, पूजा होऊन 9.30 वाजेपर्यंत मंगलपाठ व संगीतमय नवकार मंत्र पठण झाले.यावेळी सर्व सकल महिला व पुरुषांनी सफेद वस्त्र परिधान केले होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विशाल मेहता, उपाध्यक्ष गुरसाळकर,सदस्य सुरेश गांधी,निलेश गुरसाळकर,अजित खडके,रत्नदीप मेहता,सागर दोभाडा,शैलेश दोशी, सुहास दोशी तसेच सर्व श्रावक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. आज भारतभर विश्व नमोकार मंत्राचा जप करण्यात आला.