Breaking

Monday, May 12, 2025

शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा,शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही : आमदार अभिजीत पाटील


मुख्य संपादक : संतोष पांढरे(मोडनिंब)

केंद्र व राज्य शासन शेतकरी हिताच्या अनेक योजना राबवित असून त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा असे आवाहन माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी केले आहे. खरीप हंगामाच्या नियोजनासाठी पंचायत समिती, कुर्डूवाडी येथे तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठकीच आयोजन करण्यात आले होते.माढयाचे आमदार अभिजीत पाटील व करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती बैठक पार पडली.या बैठकीत खरीप हंगामातील पेरणी पूर्वतयारी, बियाणे आणि खतांचा पुरवठा, कीड नियंत्रणाचे उपाय शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना मोहिमा याविषयी सविस्तर माहिती शेतकऱ्यांना मिळाली.शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खत कसे उपलब्ध होईल याबाबत नियोजन करावे अशा सुचना केल्या असून गेल्या काही हंगामांमध्ये बी-बियाण्यांबाबत अनधिकृत दर आकारणी केल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास खपवून घेणार नसल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले. 'शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार असून, वेळेवर व योग्य दरात शेतकऱ्यांपर्यंत कृषी सेवा पोहोचावी यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी ठेवावी. अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 

करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील, जि.प.सदस्य भारत आबा शिंदे, नगराध्यक्षा मीनलताई साठे, भारतनाना पाटील, बाळासाहेब ढवळे, सुर्वणा शिवपुरे, जिल्हाकृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले, वाकडे एस. ज्योतीताई कुलकर्णी, बाळासाहेब पाटील, तालुका कृषीअधिकारी अविनाश चंदन, मिरगने आदींची उपस्थिती होती.

खरीप हंगाम पूर्व नियोजनाची बैठक पार पडली. हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व अधिकारी प्रशासनाने  आवश्यकती तयारी करावी. बियाणे, खते व कीडनाशके यांचा पुरवठा वेळेत आणि योग्य दराने करावा. कुणीही शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. 

- आमदार अभिजीत पाटील.