![]() |
| मोडनिंब विद्यानगरी ट्रस्ट मंडळांच्या सदस्यांचा सत्कार प्रसंगी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोटचे अध्यक्ष महेश इंगळे |
माढा - संतोष पांढरे(मोडनिंब)
मोडनिंब वॉर्ड क्रमांक 6 मधील विद्यानगरी हौसिंग सोसायटी मधील श्री स्वामी समर्थ मंदिर निर्माण कार्य व मूर्ती प्रतिष्ठापना माहिती घेणे संदर्भात आज मोडनिंब विद्यानगरी ट्रस्ट मंडळ सदस्यांनी अक्कलकोट येथे "श्री स्वामी समर्थ महाराज " दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान,अक्कलकोट चे संस्थापक अध्यक्ष श्री.महेश कल्याणराव इंगळे साहेब यांनी सर्व मंडळातील सदस्यांचा महाराजांची शाल व प्रसाद देऊन सर्वांचा सत्कार केला.त्यावेळी मोडनिंब येथील विद्यानगरीतील नियोजित चालू असलेल्या स्वामी समर्थ मंदीराची स्वामींचीमूर्ती दातार श्री कैलास दादा तोडकरी,उपसरपंच श्री विशाल मेहता व मंडळ सदस्य श्री अनिल आप्पा शिंदे, श्री अशोक गोवे सर,श्री चव्हाण साहेब,श्री संतोष पांढरे साहेब उपस्थित होते.
मूर्तीसाठी आर्थिक मदत देणारे श्री कैलास दादा तोडकरी व उत्कृष्ट प्रतीची मूर्ती घेण्यासाठी ज्यांचे मार्गदर्शन व मदत केली असे श्री विशाल भाई मेहता या दोघांचंही विद्यानगरी सोसायटी व मंदिर कमिटी यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले.


