![]() |
| ॲड.श्री सत्यवान शिवाजी सुर्वे |
माढा : संतोष पांढरे(मोडनिंब)
दिनांक २६/०२/२०२५ रोजी भारत सरकारच्या सही आणि शिक्क्याने
ॲड.श्री सत्यवान शिवाजी सुर्वे निवासी, मु.पोस्ट बैरागवाडी तालुका माढा सोलापूर, महाराष्ट्र यांना नोटरी कायदा, १९५२ (१९५२ चा ५३) अंतर्गत नोटरी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि त्यांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी माढा शहरात आणि संपूर्ण माढा तालुक्यात नोटरी म्हणून काम करण्यास अधिकृत करण्यात आले आहे.तसे प्रमाणपत्र त्यांना देण्यात आले आहे.
नोटरी अधिकार म्हणजे कायदेशीर बाबी मध्ये, कायदेशीर बाबींच्या कागद पत्रावर स्वाक्षरी करताना साक्षीदार म्हणून काम करताना निपक्ष असावे लागते.सुर्वे वकील साहेबांचे त्यांच्या क्षेत्रात नावलौकीक तर आहेच परंतु मोडनिंब मध्ये ते सर्व सामान्य जनतेमध्ये प्रिय व्यक्तीमत्वआहे.


