मुख्य संपादक : संतोष पांढरे
दिनांक 29 मार्च रोजी मोडनिंब येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेतील सर्व मुलींना पीएमश्री योजनेतून मोफत शैक्षणिक क्षेत्रभेट सहल आयोजित करण्यात आली होती.
या शैक्षणिक क्षेत्र भेटीदरम्यान विद्यार्थिनींना भिमानगर येथील उजनी धरण, नरसिंहपूर,अकलूज येथील अकलाई देवीचं मंदिर,शिवसृष्टी किल्ला,आनंदी गणेश मंदिर, या प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या.या सहलीसाठी परिवहन महामंडळाच्या सात बसेस मधून विद्यार्थिनींच्या प्रवासाची सोय करण्यात आली होती. तसेच विद्यार्थिनींसाठी पाणी, नाष्टा, जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती
सहल प्रस्थानावेळी एसटी बस चे पूजन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रतिनिधी औदुंबर ऊर्फ तात्या मोहीते व पालकांच्या हस्ते करण्यात आले.सरते शेवटी सहल व्यवस्थित रित्या सुखरूप पार पाडल्याबद्दल सर्व बस चालकांचा सत्कार तात्यासाहेब मोहीते व महादेव शेठ ओहोळ यांच्या हस्ते करण्यात आला.
या क्षेत्रभेटीसाठी अध्यक्षा सौ.मोहीते मॅडम, उपाध्यक्षा सौ. ओहोळ मॅडम व सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच ढोबळे सर यांनीही सहकार्य केले. ही शैक्षणिक क्षेत्रभेट सहल व्यवस्थित पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक हरिदास जाधव सर, अनिल मनाळे सर, साळवे सर, लोंढे मॅडम, लादे मॅडम, खांडके मॅडम, क्षीरसागर मॅडम, गायकवाड मॅडम, जगदाळे मॅडम, ढगे मॅडम, काळे मॅडम यांनी परिश्रम घेतले.





