Breaking

Thursday, April 3, 2025

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे उपविभागीय अधिकारी,कुर्डुवाडी यांना निवेदन


मोडनिंब प्रतिनिधी : बाळासाहेब ओहोळ

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार मा.रामदासजी आठवले साहेब व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लोकनेते मा.राजाभाऊ सरवदे साहेब व सोलापूर जिल्हा कार्यकारिणी यांच्या आदेशानुसार व बापुसाहेब जगताप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत माढा तालुक्याच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपविभागीय अधिकारी साहेब कुर्डुवाडी ता माढा यांना आर पी आय आठवले माढा तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे व बिहार मधील टेंपल अकट 1949रद्द करून महाविहाराचे 4 बौद्ध व 4हींदु हा नियम रद्द करुन महाबोधी महाविहार हे संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. तसेच माढा तालुक्यातील मौजे बुद्रूक वाडी येथील बौद्ध समाजातील मयत कांतीलाल माने यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात दावा चालवून आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली जावी व आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळु नये अशी मागणी करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला आरपीआय आठवले पक्षाचे प म सचिव चंद्रकांत वाघमारे ,प म संघटक नागनाथ ओहोळ ,सोलापूर जिल्हा संघटक पोपट लोंढे ,माढा तालुका युवक अध्यक्ष आकाश जगताप ,जि युवक कार्याध्यक्ष दादा बनसोडे ,बिबीशन कांबळे ,संतोष साळवे, वैभव ओहोळ ,सचिन शेंडगे, अशोक माने ,शेखर मोरे ,शहाजी खंदारे ,सर्जेराव भिसे ,दयानंद शेंडगे आदी पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर माढा तालुका अध्यक्ष मारुती राया वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आले.