Breaking

Sunday, March 9, 2025

नेताजी भाऊ खंडागळे व सौ.प्रतिभाताई खंडागळे यांच्या सह्याद्री फौंडेशन,उळे आयोजित "हळदी-कुंकू" कार्यक्रमा साठी महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद

 



माढा : संतोष पांढरे (मोडनिंब)

द.सोलापूर तालुक्यातील उळे गाव येथे सह्याद्री फौंडेशन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या हळदी कुंकू च्या कार्यक्रम प्रसंगी अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या सौ.शांभवीताई सचिनदादा कल्याणशेट्टी, सह्याद्री फौंडेशन चे संस्थापक व अध्यक्ष उपसरपंच नेताजी भाऊ खंडागळे व सचिव सौ प्रतिभाताई खंडागळे, गावाच्या सरपंच अंबिका कोळी,, सुरेखाताई राठोड,भाजप सरचिटणीस वर्षाराणी गवळी,शारदा निकेतन,स्प्रिंगफिल्ड नॅशनल व प्रीस्कूल, चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्यासह उळे व कासेगाव येथील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या सौ.शांभवीताई सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी महिलांना मार्गदर्शन करून महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित केले.महिलांना अगोदर चूल आणि मूल च पाहवावे लागत होते.हेच सर्वत्र पहावयास मिळत होते.परंतु महिला आत्ता घराबाहेर पडत असल्या मुळे आणि प्रत्येक क्षेत्रात स्त्री सध्या अग्रेसर दिसत आहे. महिलांचे सक्षमीकरण मोठ्या प्रमाणात झाले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.त्या यावेळी हे ही म्हणाल्या की

सण,परंपरा, उत्सव,विचारांची देवाणघेवाण, एकोपा, मनासारखे व्यासपीठ, संस्कृती जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूयात.खूपच सुंदर अशा पिशव्या त्यांनी सर्व महिलांना वाण म्हणून वाटल्या .

सगळ्या वयौगटातील महिला एकत्र येऊन असेच नाना-विविध कार्यक्रम गावोगावी आयोजित केले तर जनरेशन गॅप राहणार नाही.

प्रतिभाताई खंडागळे म्हणाल्या समाज कार्या साठी असेच गावोगावी फिरताना महिलांकडून आमच्यासाठी ही कार्यक्रम ठेवत जावा असे महिला नेहमी बोलत असत.त्यासाठीच हा केलेला प्रयत्न.महिलांना उघडपणे व्यक्त होण्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केला होता.




त्या नुसार ह्या कार्यक्रम साठी जवळपास 500-600 महिला उपस्थित राहिल्या त्यांचा हा उस्फूर्त प्रतिसाद मला खुपच भावला.तसेच

महिलांनी त्यांच्या वैयक्तिक अडी-अडचणी साठी व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या मदतीसाठी आमच्याकडे यावे.मी व आमदार सचिनदादा नेहमीच तत्पर राहू असे त्यांनी सौ.शांभवी कल्याण शेट्टी यांनी अशी ग्वाही आपणा सर्वांना दिली आहे.तसेच वर्षा राणी गवळी म्हणाल्या हळदी कुंकु साठी एवढ्या मोठ्या प्रमाणात बायका आल्याने हा कार्यक्रम इतका देखणा झाला की प्रत्येकीला वाटत होते कार्यक्रम लवकर संपू च नये.ह्या कार्यक्रम मध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हेतू नव्हता,घरगुती असा च कार्यक्रम वाटला.स्नेह व आपुलकी वाढावी हाच उद्देश. मकरसंक्रांतिचे महत्त्व ही सगळ्यांना कळावे. सर्व बायकांना हळदी-कुंकू व वाण देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.