Breaking

Sunday, March 9, 2025

तब्बल १५ वर्षांनंतर माढा तालुक्याची वार्षिक आमसभा



माढा आमदार अभिजीत(आबा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व करमाळा आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच हजारो नागरिक व अधिकाऱ्यांसोबत संपन्न


माढा : संतोष पांढरे(मोडनिंब)


तब्बल १५ वर्षांनंतर माढा तालुक्याची वार्षिक आमसभा आमदार अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हजारो नागरिक व अधिकाऱ्यांसोबत पार पडली. यावेळी असंख्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात आल्या..

सकाळी ११ ते संध्याकाळपर्यंत तासनतास् चाललेल्या या आमसभेला करमाळ्याचे आमदार श्री.नारायण आबा पाटील, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्षा, ग्रामपंचायत सदस्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.आमसभेत ३५ हून अधिक शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तहसीलदार, आमसभा सचिव तथा गटविकास अधिकारी, महावितरण कार्यकारी अभियंता, नगरपालिका मुख्याधिकारी, तालुका कृषी अधिकारी, शहर पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक,सहा. पोलीस निरीक्षक यांच्यासह शासकीय विभागाचे अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते. सोबतच क्षेत्रीय स्तरावरील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, केंद्रप्रमुख, सर्कल हे शासकीय कर्मचारी देखील उपस्थित होते. आमसभेला पूर्वपरवानगी न घेता गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश आमदार अभिजीत पाटील दिले आहेत.आमदार अभिजीत पाटील यावेळी म्हणाले की

प्रत्येक नागरिकाचे काम करणे हे वेगवेगळ्या विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम आहे तसे न झाल्यास मी स्वतः लक्ष घालून जबाबदारीने पूर्ण करेल. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा आहे, त्यांनी रयतेसाठी जी लोककल्याणकारी व्यवस्था उभी केली त्याचा पाईक होत माढा तालुक्यातील शेवटच्या घटकांचे गाऱ्हाणे ऐकणे मी माझे कर्तव्य समजतो.



या सभेत उपस्थित नागरिकांनी सिना-माढा प्रकल्प विभाग, महाराष्ट्र वीज वितरण विभाग, भूमी अभिलेख विभाग, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, पाणी व्यवस्थापन, वनविभाग यांसारख्या अन्य विभागांवर समस्यांचा पाढा सुरू केला असता त्या सर्वांच्या तक्रारी ऐकून त्यांनी संबंधितांना तक्रारींचे निवारण करण्याच्या सूचना दिल्या. सदर सभेत वेगवेगळ्या ठरावांना मंजुरी ही देण्यात आली..

आमसभेला पूर्वपरवानगी न घेता गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश केले आहेत. माढा मतदारसंघातील अनेक विकास कामाच्या किंमती वाढवून जादा बिले काढण्यात आली, तसेच काम देखील निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा तक्रारीच्या अनुषंगाने उपअभियंता यांच्याकडे केले असून तक्रारी असणाऱ्या कामांच्या चौकशीची करून निकाली काढण्यात यावेत अशा सूचना त्यांना देण्यात आल्या.



नागरिकांतून होणाऱ्या प्रश्नांच्या भडीमारामुळे उत्तरे देता देता अधिकाऱ्यांची मात्र त्रेधा उडाली.

आज घेण्यात आलेली आमसभा ही नुसती नाममात्र नसून या सभेत कुणाच्या तक्रारीचे निवारण झाले, कुणाचे नाही, या सर्व गोष्टींचे माझ्या कार्यालयात लवकरच उत्तरांची आमसभाचे आयोजन करण्यात येईल यावेळी संबंधित विभागांचे सर्व अधिकारी यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा मी स्वतः घेईल असे देखील सर्वांना आश्वस्त केले.