मावळ तालुका प्रतिनिधी : मंगेश आखाडे
दि.१७ मार्च सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास गवताला अचानक आग लागली व मुंढावरे गावच्या हद्दीतीलआदिवासी बांधवांची चारघरे आगीत जळून खाक झाली. अंगावर असलेल्या कपड्यांशिवाय कुटुंबांच्याकडे काहीही राहिले नाही. आगीत सुमारे पाच लाख रूपयांचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही.मुंढावरे गावच्या हद्दीत शंकर जाधव, गोपीनाथ भोईर, बारकू जाधव,शांताराम यलमही चार कुटूंबे राहतात.दिवसभर वीटभट्टी व बिगारी काम करूनआपला संसाराचा गाडा चालवतात.सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास गवताला लागलेल्या अचानक आगीमुळं बाजूला असलेली चार घरे जळून खाक झाली. त्यामध्ये धान्य, कपडे, व इतर वस्तू जळून खाक झाल्या.कुटुंबांतील मुले-मुलींसाठी आमदार सुनील शेळके सायकली दिल्या होत्या.त्या देखील जळून खाक झाल्या.तिथे राहणारे सर्वजण बिगारी कामानिमित्त बाहेर गेले होते.
या घटनेनंतर या चारही कुटुंबीयांना ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच राणी जाधव, सचिन गरूड, सनी जाधव यांच्यासह सर्व सदस्य व ग्रामस्थांनी अन्नधान्य, कपडे व इतर वस्तू दिल्या.ग्रामपंचायतीकडून कुटुंबांना मदतघटनास्थळी मंडल अधिकारी नीलेश अवसरमोल, तलाठी राम पाचेबाड,पोलिस पाटील नम्रता थोरात, अमोल थोरात यांनी नुकसानीचा पंचनामा करून तहसीलदार कार्यालयात जमा केला.



