सोलापूर प्रतिनिधी :
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ट्रॅक्टर्स उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सह्याद्री ट्रॅक्टर्स - सोलिस यानमार शोरूम चे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. श्रीगुरु कान्होबा महाराज देहूकर, आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी आणि शहाजीभाऊ पवार यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी सोलिस यानमार महाराष्ट्र हेड महेश इथापे यांनी सांगितले की, “सोलिस यानमार ट्रॅक्टर्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत, जे शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरतील.”
शेतकऱ्यांना उत्तम सेवा आणि दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नेताजी (भाऊ) खंडागळे यांचे कौतुक करत आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी सांगितले, “चांगल्या कंपनीसोबत चांगला डीलर असणे महत्त्वाचे असते, आणि आमच्या भागाला नेताजी भाऊसारखा उत्तम डीलर लाभला आहे. शेतकऱ्यांना योग्य सेवा आणि विश्वासार्हता मिळेल, याची खात्री आहे.”
शोरूमच्या उद्घाटन सोहळ्यात पहिल्याच दिवशी दोन ट्रॅक्टर्स डिलिव्हर करण्यात आले, तसेच एका ट्रॅक्टरची ऑन-द-स्पॉट बुकिंग करण्यात आली. यामुळे या उपक्रमाची यशस्वी सुरुवात झाली असल्याचे दिसून आले.
या भव्य सोहळ्यास प्रल्हाद काशीद, महेश इथापे, हेमंत पिंगळे, महादेव गवळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेतकरी बांधवांसाठी हे शोरूम अधिक फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.





