Breaking

Saturday, March 22, 2025

मोडनिंब येथे पार्थ दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यात होणार विविध सामाजिक उपक्रम : उदय दादा माने



मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)                                                                                
सोलापूर जिल्हातील जि.प शाळेत गरजू विद्यार्थ्यांना होणार २१०००
वह्या वाटप तर वृद्धाश्रमात होणार २१००० वृद्धांना ब्लॅंकेट वाटप

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित दादा पवार यांचे सुपुत्र पार्थ दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोडनिंबचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत नेते उदयकीर्ती एंटरप्राईजेसचे मालक तसेच उदयकीर्ती अर्बन बँकेचे चेअरमन उदय (दादा) माने यांनी पार्थ दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेऊन यथोचित वाढदिवसानिमित्त सत्कार केला व २१००० वह्या वाटपाचे प्रकाशन माननीय दादांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सोबत राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण, नवी मुंबई कार्याध्यक्ष कांबळे व प्रमोद जाधव उपस्थित होते.

पुढे पार्थ (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उदय (दादा) माने यांच्या आयोजनातून सोलापूर जिल्हाभर त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे.सलग पाच दिवस होणाऱ्या विविध उपक्रम कार्यक्रमाची माहिती मोडनिंबचे राष्ट्रवादीचे नेते उदय (दादा) माने यांनी दिली.

यामध्ये मंगळवार दि.२५ मार्च रोजी भव्य रांगोळी स्पर्धा (खुला गट) असून या स्पर्धेची वेळ सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजेपर्यंत असणार आहे.या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस सोन्याची नथ,द्वितीय बक्षीस पैठणी साडी तर तृतीय बक्षीस डिनर सेट आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तृप्ती लेंगरे मो:७२१८३०६७९९ व भक्ती पवार मो:९६२७९०२२२२ या नंबर वर संपर्क साधून नाव नोंदणी करून घ्यावी तर या स्पर्धेचे ठिकाण उदय किर्ती अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या ठिकाणी या स्पर्धा संपन्न होणार आहेत.

बुधवार दि.२६ मार्च ते रविवार दि.३० मार्च पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेमधील गरीब गरजू मुला-मुलींना २१००० वह्या वाटप करण्यात येणार आहेत.तसेच मंगळवार दि.०१ एप्रिल ते गुरुवार दि.१० एप्रिल पर्यंत वृद्धाश्रमातील व्यक्तींना मदत म्हणून सोलापूर जिल्ह्यातील विविध वृद्धाश्रमातील वृद्धांना २१००० ब्लँकेट वाटप करण्यात येणार आहे.

मोडनिंबचे उदय (दादा) माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ३५ ते ४० वर्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी आजपर्यंत पक्षाच्या मार्फत तसेच वैयक्तिक स्वखर्चातून अनेक सामाजिक उपक्रम,विकास कामे राबवली आहेत व स्वतःच्या उदयाकिर्ती अर्बन बँकेतर्फे तसेच शैक्षणिक कामात मजल मारली असून हजारो गोरगरीब कुटुंबाला त्यांनी मदत केली आहे.