Breaking

Sunday, March 30, 2025

ग्रामपंचायत कर्मचारी युनियन माढा तालुका उपाध्यक्षपदी विठ्ठल मोरे यांची निवड


मोडनिंब (प्रतिनिधी ): 

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या माढा तालुका उपाध्यक्षपदी विठ्ठल मोरे ( ग्रामपंचायत जाधवाडी मो ) यांची एकमताने निवड करण्यात आली. युनियनची कुर्डूवाडी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राज्याध्यक्ष मोहन लामकाने यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली.


सोलापूर जिल्हा अध्यक्ष दिलीप जाधव व महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अरुण सुर्वे यांनी त्यांना निवडीचे पत्र सपूर्द केले.नुतन उपाध्यक्ष यांचा सत्कार माढा तालुका अध्यक्ष नागराज लोंढे सचिव दिलीप वाघमोडे यांनी केला . यावेळी आप्पा कोळी, विक्रम नाळे, शैलजा पाटील,पुष्पा ताबे,अशोक कदम, जयराम भिसे,नवनाथ साळवी, नवनाथ येळे,बालाजी पवार, वैभव वीर, रोहीदास वाघमारे व इ. कर्मचारी उपस्थित होते.नुतन उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल खासदार धैर्यशील मोहिते पाटील,आमदार अभिजीत पाटील यांनीही अभिनंदन केले आहे