Breaking

Saturday, March 29, 2025

" माय सावित्रीबाई फुले दाखल करू शाळेत मुले " या अभियानास उपळाई केंद्रात सुरवात,पालकांचा उत्तम प्रतिसाद

पालकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश निश्चित करावा ; केंद्रप्रमुख दिगंबर काळे

मुख्य संपादक : संतोष पांढरे

" माय सावित्रीबाई फुले,दाखल करू शाळेत मुले "या अभियानास उपळाई केंद्रात सुरवात झाली असून नवीन चालू शैक्षणिक वर्षात इयता पहिलीत प्रत्यक्ष मुलांना शाळेत दाखल करून घेतले जात आहे. पालकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे.पालक उपळाई केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश निश्चित करताना शाळे विषयी खूप बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.

निपुण भारत निपुण महाराष्ट्र दर्जेदार इंग्रजी शिक्षण उपचारत्मक अध्यापन तंत्रज्ञानाचा व शैक्षणिक साधनांचा अध्यापनात वापर शाळा, पूर्व तयारी मेळावे, केंद्रस्तरीय स्नेहसंमेलन, निपुण माता गट मेळावे यासारखे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला पोषक अनुरूप असे विविध प्रकारचे उपक्रम घेतल्याने मुलांची गुणवत्ता वाढली आहे.यामुळेच जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा ओढा असल्याचे विचार शहाजी क्षीरसागर,धनाजी घाडगे यांनी मांडले.शिक्षण प्रेमी नागरिक यांनीही आपले उत्तम असे मनोगत व्यक्त केले.

पालकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश निश्चित करावा असे केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी सांगितले.