मोडनिंब प्रतिनिधी
८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त लोकमंगल पतसंस्था मोडनिंब शाखेच्या वतीने सम्रृद्ध गाव,सोलंकरवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळा सोलंकरवाडी येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. मंजिरी मधुसूदन बचुटे (समाजसेवा),चंदन भिमराव मोरे (माजी सरपंच),कल्पना धनाजी भांगिरे (व्यवसायिक),शुभांगी समाधान भांगिरे (गृहिणी), यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गावामधील आलेल्या महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेवून विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.पहिली ते सातवी पर्यंतच्या शालेय विद्यार्थांना यावेळी खाऊ वाटप केला. या कार्यक्रमासाठी सोलंकरवाडी गावचे माजी सरपंच अनंता गलांडे, मार्गदर्शक राजाभाऊ भांगीरे,विभागीय अधिकारी वैभव पाटील (साहेब) व शाखाधिकारी समाधान वसेकर,बागल,माळी,,व इतर कर्मचारी उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमासाठी सोलंकरवाडी गावचे प्रतिनिधी व शाखेचे सल्लागार शहाजी यादव,तानाजी इंगळे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ग्रामस्थ,गावातील महिला उपस्थित होत्या.हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण केदार सर,अनिल रोकडेसर,इतर शिक्षक यांनी परिश्रम घेतले.


