मोडनिंब प्रतिनिधी-
श्री क्षेत्र बारडगाव ते दत्तक्षेत्र गाणगापूर पायी पालखी दिंडी सोहळ्याचे बुधवारी बैरागवाडी ( मो ) येथे भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.यावेळी तात्या सुर्वे, बाळासाहेब सुर्वे यांनी या सोहळ्याचे आरती करून स्वागत केले. बालसंन्यासी हभप सुरेश महाराज सुद्रिक बारडगाव यांच्या मार्गदर्शनाखाली दतभक्तांच्या पायी दिंडी सोहळ्याने बारडगाव येथून शनिवारी १ मार्चला सकाळी प्रस्थान ठेवले आहे.हा सोहळा राशीन,राजुरी,आदिनाथ कारखाना जेऊर,टेंभुर्णी,बैरागवाडी,मोडनिंब,मोहोळ,केगाव,कुंभारी,अक्कलकोट,दुधनी,बोमनळी व शेवटी श्रीक्षेत्र गाणगापूर या मार्गाने हा सोहळा पायी जातोय.गुरुवारी १४ मार्चला गोरक्षनाथ मठ, खराडे अण्णा गुरुजी संगम गाणगापूर येथे दिंडीचा मुक्काम होईल. या दिंडित विणेकरी म्हणून मारुती गावडे हे सेवेकरी आहेत.तर पायी दिंडीची व्यवस्था सुरळीतपणे होण्यासाठी शेळके बेरडी,बापू भोसले,दत्ता भोसले,मधु गिरमकर,रायकर महाराज कापसे,लोंढे,पद्मिनी गिरमकर,निलेश गावडे,नंदु गावडे,अनिल जमादार,बाळु रास्ते,अविनाश पवने,नवनाथ रेके,नंदकिशोर गावडे हे दिंडीची व्यवस्था पहात आहेत.बैरागवाडी मोडनिंब येथून दत्त भक्त या दिंडीत सहभागी झाले आहेत.


