बारामती प्रतिनिधी :
परमपूज्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ जयंती अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव बु|| येथे पार पडली. यावेळी पुस्तकांवर अपार प्रेम करणारे व्यक्तीमत्व म्हणजे परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे मत सांगली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गट निदेशक तुकाराम कदम यांनी व्यक्त केले. याप्रसंगी माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी श्री.सचिन लोखंडे,अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी श्री.संतोष सपकळ, शिल्प निदेशक निखिल बागल, पोलीस अंमलदार विकास राखुंडे, भारत तुपे, आसिफ शेख, सुभाष साठे, पोपट नेटके, आदी उपस्थित होते.यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे व अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक संतोष सपकळ यांनी केले.बाबासाहेबांनी अस्पृश्य दलित यांना समाजामध्ये स्थान मिळवून दिले.तसेच भारत देश एक संघ राहण्यासाठी प्रयत्न केले बाबासाहेबांना कितीही उपमा दिल्या तरी त्या कमीच आहेत. अशा थोर महामानवास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन असे प्रतिपादन तुकाराम कदम यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अवधूत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी संतोष सपकळ व निखिल बागल यांनी केले होते.


