मुख्य संपादक : संतोष पांढरे
दि.13/04/2025 रोजी बारामती येथे WDSO- वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन आयोजित विश्वमाता अहिल्यादेवी होळकर यांची साप्ताहिक पूजा-आरती सकाळी 11.00 वाजता विघ्नहर्ता ग्राफिक्स,पाटस रिंग रोड, बारामती येथे संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष रुग्ण मित्र श्री अविनाश बापू गोफणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून चेतन प्रमोद दोशी मालक के मार्ट बारामती होते. प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेची पूजन व आरती करण्यात आली. श्री अविनाश बापू गोफने माजी सभापती पंचायत समिती बारामती, विलास माळशिकारे सर, मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघ, प्रशांत आटोळे, शिवनंदन लॅब चे मालक श्री. हनुमंत खामगळ पुणे जिल्हा उपाध्यक्ष निखिल बाराते यांचे हस्ते आरती घेण्यात आली.
यावेळी लोकनायक संपादक व पत्रकार संघ बारामती शहर चे संपादक आझर आत्तार यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम साठी श्री.चेतन प्रमोद दोशी अध्यक्ष पुणे जिल्हा रिटेल व्यापारी असोसिएशन किराणा व्यापारी असोशियन मालक के मार्ट बारामती, श्री विलास माळशिकारे सर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघ, हनुमंत खामगळ शिवनंदन लॅब, श्री प्रशांत आटोळे, WDSO संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष बबनरावजी आटोळे सर WDSO, पुणे जिल्हा नेते अनिल आवळे सर पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अरविंद वाघमोडे पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष निखिल विठ्ठल बाराते पुण्य प्रहार पत्रकार अझर आत्तार, अनिकेत मारकड पाटिल,कोकरे पाटील उपस्थित होते.



