Breaking

Friday, April 18, 2025

विश्व हिंदू परिषदेची पुणे ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी जाहिर



मावळ तालुका प्रतिनिधी : मंगेश आखाडे

वडगाव मावळ-विश्व हिंदू परिषदेची पुणे ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे. विभाग मंत्री पदी सोमनाथ दाभाडे, जिल्हा मंत्री पदी महेंद्र असवले आणि जिल्हा अध्यक्ष पदी अमोल पगडे, बजरंग दलाच्या जिल्हा संयोजक पदी अमित भेगडे यांची निवड करण्यात आली.पुणे येथे विश्व हिंदु परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दाभाडे,असवले, पगडे व भेगडे यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. केंद्रीय अध्यक्ष आलोक कुमार,क्षेत्रीय संघटन मंत्री गोविंद शेंडे, प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.प्रांतमंत्री किशोर चव्हाण यांनी प्रखंड,जिल्ह्यात होणारे संघटनेचे उत्सव, साप्ताहिक मिलन,संस्कार वर्ग यांचा आढावा घेतला व प्रांतातील विश्व हिंदू परिषदेच्या कार्याला साठ वर्षे पूर्ण झाले.त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.सामाजिक समरसता अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील राहील.विश्व हिंदु परिषद व संघटनेच्या विविध आयामांच्या विभाग व जिल्ह्याच्या नियुक्त्या जाहीर केल्या.पुणे ग्रामीण विभाग मंत्री म्हणून सोमनाथ दाभाडे, जिल्हा अध्यक्षपदी अमोल पगडे, जिल्हा मंत्री महेंद्र असवले, बजरंग दल संयोजक अमित भेगडे, दुर्गावाहिनी संयोजिका मृदुला वैशंपायन, मातृशक्ती संयोजिका राजश्रीताई वाघचौरे यांच्या नावाच्या घोषणा केल्या, यावेळी उपस्थित सर्वांनी हात उंचावून ओम म्हणून अभिनंदन केले.

परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी देशातील सद्य स्थिती, धर्मा पुढील आव्हाने,पर्यावरण या विषयावर मार्गदर्शन केले. गोविंद शेंडे यांनी संघटनेची रचना कार्य व आण्णा पंडीत यांनी संघटनेच्या पुढील कार्याचे नियोजन यावर सविस्तर माहिती दिली, प्रांताचे सहमंत्री सतीश गोर्डे, प्रांताचे सहमंत्री नितिन वाटकर,अँड. मृणालिनी पडवळ, निधी प्रमुख धनाजी शिंदे आदी प्रांताचे जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

महेंद्र असवले
" विश्व हिंदू परिषदेची संस्कृतीनिष्ठादेव विचारधारा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी काम करणार आहे. देव, देश आणि धर्माची सेवा करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत " :-महेंद्र असवले