मुख्य संपादक : संतोष पांढरे
आशा सोशल फाऊंडेशन ही एक नोंदणीकृत खाजगी विश्वस्त संस्था आहे.श्री किशोर काशिनाथ पारखी सदर संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. सदर संस्थेच्या अंतर्गत जांभुळवाडी कात्रज पुणे येथे "हेल्प व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राच्या" माध्यमातून समाजातील अनेक दारु,गांजा व इतर अंमली पदार्थांच्या व्यसनामध्ये सापडलेल्या व्यसनी लोकांसाठी गेली १२ वर्षे कार्य करत असून श्री किशोर पारखी त्यांना व्यसनमुक्तीबाबतचा किमान 20 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे.
श्री किशोर पारखी स्वतः एकेकाळी पूर्णपणे व्यसनाधीन झाले होते. स्वतःच्या आयुष्याची पूर्णपणे धूळधाण झाली होती. त्यांना व्यसनाच्या दुष्टचक्रातून बाहेर यावयाचे होते, परंतु मार्ग मिळत नव्हता.स्वतः एकदा नव्हे अनेक वेळा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाऊन उपचार देखील घेतले होते, तरी देखील त्यांना ह्यातून बाहेर यायला बराच कालावधी लागला.बऱ्याच वेळा व्यसनमुक्ती केंद्राच्या उपचारांकडे फारसे गांभीर्याने न बघितल्याने त्यांना वारंवार व्यसनाधीनतेमध्ये अडकावे लागत होते.परंतु एकदा मात्र तशी वेळ आली आणि स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या जिद्दीने त्यांनी स्वतःत बदल करण्यास सुरुवात केली आणि दीर्घकाळ व्यसनापासून दूर राहुन स्वतःसारख्याच ह्या व्यसनाच्या दुष्टचक्रामध्ये अडकलेल्या व्यसनी लोकांसाठी व्यसनमुक्ती केंद्र चालू केले.२०१४ मध्ये धायरी पुणे येथे एका भाड्याच्या जागेमध्ये त्यांनी सर्वप्रथम हे केंद्र चालू केले. सुरुवातीला प्रचंड कष्ट घेऊन त्यांनी संस्थेच्या माध्यमातून अनेक व्यसनी बाधवांना व्यसनाबद्दल पूर्ण माहिती देऊन त्यातून बाहेर येण्यासाठी कशा प्रकारे प्रयल करावे लागतात याबाबत व्यवस्थित मार्गदर्शन करायला सुरुवात केली. सदर जागेमध्ये २०१७ पर्यंत हे केंद्र चालू होते. २०१७ मध्ये जांभुळवाडी कात्रज येथे स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये स्थलांतर करून प्रशस्त जागेमध्ये किमान ६० व्यसनी बांधवांना उपचार करवुन घेता येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आजवर २०१४ पासून ह्या केंद्रामध्ये उपचार घेऊन गेलेल्या शेकडो व्यसनाधीन बांधव पूर्णपणे व्यसनमुक्त होऊन समाजामध्ये पुन्हा एकदा मिळूनन मिसळून गेले आहेत. इतर व्यसनमुक्ती केंद्रांचा विचार करता येथील उपचार पध्दतीमुळे व्यसनी बांधवांना आत्मपरीक्षण करण्याची जास्त संधी मिळते व त्यामुळे त्यांना त्यांच्या हातून घडलेल्या चुका कशा टाळता येतील हयावर व्यवस्थित लक्ष केंद्रीत करता येते. करता येते. त्यामुळे येथून उपचार घेऊन बाहेर पडलेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.अजूनही समाजामध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण लक्षणीय आहे. सध्या असलेल्या मोबाईल इतर समाजमाध्यमांमुळे युवा वर्गामध्ये वळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच समाजामध्ये जागृती करण्यासाठी संस्थेतर्फे विविध महाविद्यालयांतून, विद्यापीठातून आणि पथनाट्याद्वारे जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येतात. मध्यंतरी आलेल्या करोनाच्या लाटेमध्ये देखील संस्थेने एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले होते.
ह्या संस्थेचे, घोषवाक्यच असे आहे "आम्ही देण लागतो. ..... समाजऋऋण फेडण्यासाठी." सुरुवातीपासूनच ह्या संस्थेचे आणि श्री. किशोर पारखी ह्यांचे हेच ध्येय आहे.त्याच सामाजिक बांधीलकी च्या भावनेतून सदर संस्थेने एक नवीन उपक्रम चालू केला आहे. त्यामध्ये वृद्ध लोक अपघातामुळे अपंगत्व आलेले, अर्धांगवायूने त्रस्त व व अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी अल्प दरामध्ये "सावली केअर सेंटर" या नावाने केंद्र चालू केले आहे.
श्री किशोर का पारखी
मोः ८४८४०८६०३२





