Breaking

Monday, April 7, 2025

बारामती येथे विश्वमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साप्ताहिक पूजा व आरती संपन्न



मुख्य संपादक : संतोष पांढरे

दिनांक 6/04/2025 रोजी बारामती येथे WDSO- वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन आयोजित विश्वमाता अहिल्यादेवी होळकर यांची साप्ताहिक पूजा व आरती  सकाळी 11.00 वाजता संपन्न झाली. प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे पाहुणे छत्रपती उद्योग समूह व राजवाडा पार्क चे मालक आनंद सावंत यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. महेश अहिवळे,बारामती तालुका प्राथमिक शिक्षक समिती चे तालुका अध्यक्ष श्री. सचिन हिलाळ,अंगणवाडी शिक्षिका जळगाव सुपे श्रीम.अरुणा महेंद्र खोमणे, चंद्रप्रभा नागरी पतसंस्था बारामतीचे सचिव श्री. मछिंद्र गोपीनाथ खोमणे,WDSO वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय सचिव श्री. प्रा.अजय गाढवे सर, VJNT राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  हवेली चे अध्यक्ष श्री. दिलीप गाडेकर,उरुळी कांचन उद्योजक श्री.प्रकाश धुकटे, उरुळी कांचनचे उद्योजक श्री प्रवीण जुन्नरकर ,WDSO चे मार्गदर्शक सुनील देवकाते (भैय्या ),मार्गदर्शक महेंद्र खटके, WDSO - वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष बबन आटोळे सर, राष्ट्रीय सचिव अजय गाढवे सर, पुणे जिल्हा नेते अनिल आवाळे, डॉक्टर असोसिएशन चे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रवीण मोकाशी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष निखिल बाराते, जिल्हा संपर्कप्रमुख अरविंद वाघमोडे, मयूर पानसरे, अनिकेत मारकड व इतर बांधव उपस्थित होते.

WDSO - वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन तर्फे विश्वमाता  यावेळी बारामती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव यांचा सत्कार करण्यात आला. WDSO - वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे राज्य समन्वयक पदी मछिंद्र गोपीनाथ खोमणे, पुणे जिल्हा महिला संघटक पदी अरुणा खोमणे तरी  डॉक्टर असोसिएशन पुणे जिल्हा अध्यक्ष पदी डॉ. प्रवीण मोकाशी यांची निवड करण्यात आली.