मावळ तालुका प्रतिनिधी - मंगेश आखाडे
श्री जगद् गुरू महाराज गोशाळेला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले.ही घटना धामणे येथे दि २ एप्रिल बुधवारी दुपारी घडली.येथील सुमारे १,६८२जनावरे घटनास्थळापासून दूर होती.शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे तपासात पुढे आले आहे.याबाबत गोशाळेचे कोषाध्यक्ष रूपेश गराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ येथे गाई, म्हशी,शेळ्या आणि इतर अशा एकूण १,६८२प्राण्यांचा सांभाळ केला जातो. त्यांचा चारा आणि इतर खाद्य या गोशाळेत होते. तर ही जनावरे दूर होती. दरम्यान दुपारच्या सुमारास येथे आग लागली.वाऱ्यामुळे तिने रौद्ररूप धारण केले.”काही नागरिकांनी ही माहिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि पीएमआरडीचे अग्निशामक दलाला दिली. जवानांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, तोपर्यंत येथील ट्रॅक्टर, जेसीबी, सुका चारा, बैलगाडी,शेतीची अवजारे जळाली. यामुळे मोठे नुकसान झाले. यामुळे ग्रामस्थ आणि पशुप्रेमी हळहळ व्यक्त करीत आहेत.


