मावळ प्रतिनिधी : मंगेश आखाडे
दि २४ रोजी समकालीन प्रकाशन संस्था आणि शांतीवन या संस्थानी एकत्र येवून वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी जागर समकालीन वाचनाचा ही चळवळ उभारली आहे. या योजने अंतर्गत पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून विद्यालयास देणगीदार श्री. महेश चौधरी यांनी सहा हजार रुपये किंमतीची प्रेरणादायी पुस्तकांचे संच भेट दिले.संस्थेचे प्रतिनिधी नागेश चव्हाण यांनी अनुभव मासिक शाखेला पाठविण्याचे आश्वासन दिले. सर्व विद्यार्थ्यांना ही पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली,या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य सतीश हाके, उपमुख्याध्यापक शिवाजी मोहिते आणि पर्यवेक्षिका प्रज्ञा गायकवाड हे उपस्थित होते.वाचनाचे महत्व यावेळी प्राचार्यांनी विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता शेटे यांनी केले. ग्रंथालय प्रमुख विद्या दगडे यांनी पुस्तक संचाची नोंदणी करून पुस्तके विद्यार्थ्यांना दिली. यावेळी जयश्री बोरसे, अरंविद ढाकणे, गणेश शेंडगे, व विद्यार्थी वृंद उपस्थित होते.



