माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेतर्फे वरील क्यू आर कोड स्कॅन करून सहभाग नोंदविण्याचे आव्हान
मावळ प्रतिनिधी: मंगेश आखाडे
वडगाव मावळ येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या माजी विद्यार्थ्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन एक मे रोजी शाळेच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे अशी आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे आयोजन शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेतर्फे करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून माझी शाळा या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हावे. https:lchat.whatsapp.com/DtXCC896B7U4H6C3EauII2 किंवा क्यूआर कोड स्कॅन करून ग्रुपला जॉईन व्हावे अशी आवाहन करण्यात आले आहे.सर्व माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकत्र येण्याची आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी येणारा हा मेळावा असणार आहे.तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम पण आणि शाळेच्या प्रगतीचा आढावा घेणारे सत्र असणारा हा मेळावा होणार आहे. उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य सतीश हाके यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्यासोबत काही माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सन्मान देण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सर्व माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या शाळेबद्दल चा अभिमान व्यक्त करावा असे आव्हान आयोजकांकडून करण्यात येत आहे. जास्तीत जास्त संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित राहावे आणि आपल्या शाळेच्या मित्र-मैत्रिणींनी तसेच गुरुजनांना भेटावे यासाठी आम्ही आपली वाट पाहत आहोत अशी साद माझी विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे.


