Breaking

Saturday, May 24, 2025

लोककल्याणकारी आदर्श प्रशासक - राजमाता अहिल्यादेवी होळकर


             महान तपस्वी लोकमाता अहिल्यादेवी होळकर

---------------------------------------------- 

      लेखक : प्रशांत अडसुळे , कानेगाव.

ज्या मनगटात बळ बुध्दी आणि चार्तुय  आहे, तोच स्व -कर्तत्वावर लोकाभिमुख राजा बनु शकतो असा संदेश देणा-या  व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो. अशा महान तपस्वी लोकमाता अहिल्यादेवी होळकर होय सर्वधर्म-समभाव अस्पृश्यता उच्चाटन,सामाजिक एकामता, स्त्री –पुरूष समानता, गोरगरीबाविषयी कळवळा ,हुंडा पध्दतीतील उच्च्टन अनिष्ठ चालीरिती पशुपक्षी ,प्राण्यावरील असलेली सहानुभूती रूढी परंपराचा बीमोड प्रजेविषयी तळमळ सामाजिक, धार्मिक , राजकीय, औद्योगिक ,कृषी ,कला क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या जगाच्या पाठीवरील एकमेव महाराणी म्हणजे अहिल्यादेवी  होय,

३१ मे १७२५ रोजी अ. नगर म्हणजे आजचे ( अहिल्यानगर ) जिल्हयातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोटयाशा खेडयातील माणकोजी शिंदे (पाटील) व सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी एका कन्येचा जन्म झाला.

"स्वातंत्र्य रक्षिण्या अपुले ,ही वीर रणरागिनी झाली,

ही गोर गरिबांची - दिन दुबळ्या ची माय माऊली

थोर अहिल्या माता जन्मा आली "

त्या कन्येचे नामकरण "अहिल्या" असे ठेवण्यात आले. माणकोजी शिंदे यांची ओळख कर्तबगार व प्रतिष्टीत व्यक्ती होते.बालवयातच अहिल्यादेवीना वडिलांकडूनच शिक्षणाचे धडे मिळत असे ,माळव्याचे सुभेदार मल्हारराव होळकर  पुण्याला जात असताना  चौंडी या गांवात पोहचले सोबत काही सौनिक घोडेस्वार घेऊन गांवात प्रवेश केला घोडयाच्या टाप्पाचा आवाज ऐकताच गांवातील लोक भय-भित झाले जेथे जागा मिळेल तेथे लपून बसू लागले मल्हार रावांना हे पाहून आश्चर्य वाटू लागले हे लोक का घाबरलेत काहीच समजेना अशातच समोरुन एक चिमुकली घोडयाच्या दिसेन येत असल्याचे दिसले ती चिमुकली घोडेस्वार च्या जवळ येऊन म्हणून लागली तूम्ही कोण कोठे निघालात जेवण करणार का पाणी पिणार का ? हे सर्व बोल एैकुन मल्हाररांव घोडयावरुन खाली उतरले चौकाशी करु लागले तु कोणाची पोर तुझे नाव काय तुला भिती नाही का ?वाटली ,अहिल्याचदेवीचे निर्भीड बोल एैकूण आश्चर्य  वाटू लागले मला तुझ्या बाबांची भेट घ्यायचे आहे अहिल्यादेवीनी आपल्या वडिलांची भेट करुण देण्यासाठी आपल्या घरी घेऊन गेल्या , घरी आलेल्या अतिथीचे पाहूणचार कसे करावे हे आहिल्यादेवी कडून शिकण्यासाखे वाटू लागले अहिल्यादेवीच्या प्रत्येक गोष्टीचे निरक्षण करु लागले , माणकोजी शिंदे यांच्या सोबत चर्चा झाली मुख्य विषयला हात घातला आपल्या कन्येची बुध्दीमता , चार्तुय , निर्भिड ,धाडस तसेच आलेल्या पाहूण्याचे पाहूणचार पाहून आम्ही धन्य झालो, आम्हास आपली "आहिल्या " होळकर राजघराण्याची सून म्हणून आम्हास पसंत आहे , निर्णय आपल्या हाती आहे निरोप लवकर कळवावे.असे बोलून मल्हार राव पुण्याकडे कूच केले. माणेकोजी शिंदेना आनंदच झाला खूद होळकरशाहीचे संस्थापकाचे आपल्या घराला पाय लागले आणि आपल्या अहिल्यानां होळकरघराण्याची सून म्हणून मागणी या पेक्षा सर्वात मोठा आनंद कोणताच नाही ,काही दिवसानंतर माणकोजी शिंदेनी निरोप पाठवला आमचा होकार हाय  सन  २० मे १७३३ रोजी पुणे येथील शनिवारवाडा येथे शाही थाटात खंडेराव व अहिल्यांदेवीचा विवाह पार पडला या विवाहस खूद श्रीमंत बाजीराव पेशवे(प्रथम),अलीजा बहादूर, सरदार शिंदे ,पिलाजी जाधव ,मल्हारराव होळकर यांच्या उपस्थित विवाह संपन्न झाला.

" जगाच्या पाठीवर सासु-सासरे कसे असावे याचे उत्तम उदा म्हणजे मल्हारराव होळकर व गौतमीबाई यांच्याकडे पाहावे लागेल* "तसेच आदर्श कर्तबगार सून व पत्नी म्हणून अहिल्यादेवीचाच आदर्श घ्यावे लागेल ,खंडेराव व अहिल्यादेवीचा संसार गुण्या –गोविंदाने सुरु झाला घरामध्ये आनंदाचे वातावरण प्रसन्न् झाले.खंडेराव ही कर्तबगार ,निर्भीड धाडसी नेतृत्व् गुण असलेले विर होते . खंडेराव मोहिमेवर जाऊ लागले,कधी कोणता प्रसंग होळकर घरण्यावर येईल ही दूरदृष्टी डोळयासमोर ठेऊन  मल्हाररावांनी आपल्या सूनेस आहिल्यादेवीस शिक्षणाचे धडे देऊ लागले यातून गनिमी कावा, भाला फेक , तलवारबाजी, घोडेस्वार असो असे अनेक धडे देऊ लागले,शत्रूंना आपल्या अनुउपस्थिीमध्ये चोक उत्तर देता येईल असे शिक्षण मल्हाररावांनी आपल्या सुनेस दिले.(जगातील ही पहिली घटना असेल) होळकरशाहीचे साम्राराज्य दिवसोन-दिवस वाढत जात होते, मल्हाररावांचा  दबदबा इतका वाढला की, शत्रुची झोप ऊठून जाऊ लागली “’ मल्हार आया ’’ही वार्ता शत्रुंच्या जरी कानी पडली तर शत्रू च्या छावण्या पळता भुई होत असे ,कालातरांने खंडेराव व अहिल्यादेवीच्या पोटी एक पुत्र सन १७४५ मालेराव व सन १७४८ मध्ये एक कन्या मुक्ताबाई चा जन्म् झाला. सन १७५४ मध्ये खंडेराव होळकर कुभेंरीच्या लढाईत धारातीर्थी पडले,दु:खाचा डोंगर होळकरशाहीवर आला अशातच अहिल्यादेवी सती जाण्यासाठी निघाल्या मल्हारराव विनंती करु लागले अहिल्या तु आम्हास सोडून जाऊ नकोस अहिल्या यावर कोणी काही बोलायला तयार नव्हते .कारण पती वारल्यानंतर सती जाणे ही रुढ, प्रथा होती.मल्हाररांवाना हे रुढ मान्य झाली नाही अहिल्याबाई समोर जाऊन हात जोडले हंबरडा फोडला माझा खंडा गेला पण मीच तुला खंडा म्हाणून बघतो अहिल्या आमच्यासाठी तुच खंडा आहेच तु जर आम्हास सोडून गेली तर आमचं काय होणार,येथील जनतेच काय होणार मन घटट करुन घेतलेला निर्णय माघार घ्यावं म्हाणून मल्हार रावांनी विनवणी केली .अहिल्यादेवी नी  घेतलेला निर्णय माघार घेतला. सर्वात जास्त जर संघर्ष कोणाच्या वाटेला आला असेल तर एकच नाव पुढे येईल .. अहिल्यामाई.

काही कालावधी नंतर मल्हारावांचा मृत्यू  २० मे १७६६ ला झाला .होळकर घरण्यावर एका पाठोपाठ एक सकंट येऊ लागले ,मालेराव काही दिवसांनी महिन्यातच आजारी पडला पाहाता-पाहाता मालेराव ही २७ मार्च १७६७ साली देहाअंत झाला ,अशा अनेक प्रसंग आहिल्या मातेच्या वाटेला येऊ लागले .पण मल्हाररांवानी हाडंच पाणी करुण हे साम्राज्य् जनतेच्या कल्यानासाठी उभा केलेले हे मोडीत काडणे म्हणजे आपल्या सास-याचा अपमान आहे .आपल्या सास-यांची जी शिकवण मिळाली जे धडे घेतले ते संकट काळात उपयोगी आले. सर्व राज्य् कारभार अहिल्यादेवीच्या हाती आला.अशा पस्थितीत एक महिला काय करु शकते या भ्रमात पेशवा रघुनाथराव राहू लागले .होळकशाहीचा व दौलतीचा मोह सुटला ,होळकरशाही पेशवाईत विलीन करण्याची योजना आखू लागले,होळकरशाहीवर अक्रमण करण्यासाठी ५० हजाराची फौज घेऊन इंदोरच्या दिसेन निघाला ,ही वार्ता गुप्त हेर खात्याकडून आहिल्यादेवस समजली विलंब न करता रघुनाथरावांना खलिता लिहिला त्या मध्ये रघुनाथरावांना समज देण्यात आली,हे होळकरशाही चे साम्राराज्य कोणाकडून फुकट मिळाले नसून माझ्या सास-यांने प्रजा हितासाठी संघर्ष करुन , तलवारीच्या पात्यावर व घोडयाच्या टाचावर हे राज्य मिळवले.आपण कपट नितीने जर  होळकर राज्य लुटण्याचा प्रयत्न केला तर  मी आपल्या विरुद्ध मल्हाररावांची सुन म्हणून  रंणगंणात उतरेण माझ्या शी लढई करताना विचारपूर्व करावा मी हरले तर इतिहास जमा होईल , आपण हारलात तर तोंड दाखवायला ही कोठे जागा शिल्क राहाणार नाही .मी वाट पाहाते आपण या होळकर साम्राज्यात पाय कधी ठेवता .हे शब्द वार्ता वाचताच रघुनाथराव घेतलेला निर्णय बदले ,पण आपण माघार घेतल्यास आपल्या नावाची ना चक्की होईल म्हणून लगेच आहिल्यादेवशी दुसरा खलिता पाठविला त्या मध्ये संबोधीत करतात की, मॉ.साहेब आम्हास होळकरशाहीचा दब-दबा साम्राज्यात असल्याचे ज्ञात आहे.आपले कार्य जन हितासाठी महत्व पूर्ण याची जाणिव आहे.आम्ही येणार या साठी की आपल्या दु:खाचे सात्वन करण्यासाठी येत होतो आपण आमच्या बददल काही गैरसमज करुन घेऊ नये ,हा खलिता आहिल्याबाईनी वाचला ,रघुनाथराव जर आमच्या दु:खात येत असाल तर ५० हजाराची फौज कशासाठी,जरी माणुसकीने आलात तर आपले स्वागत करु आणि कपट नितीने जर आलात तर आपणास हत्तीच्या पायी देऊनच होळकरघराण्याची सुन म्हणून सांगणार नाही.रघूनाथरावांनी हा खलिता वाचले ते तिकडेच गप्प झाले. 

" लोककल्याणकारी राणी अहिल्यादेवी राज्य कारभारात तरबेज होत्या , . दिन दुबळ्या साठी आईसमान , तत्वज्ञानी आणि कुशल संघटक राज्यकर्ती होत्या .  या वरुन असे लक्षात येते की, शत्रूना मैदानात हरवण्या आधी त्याच्या मनाने हरवले पाहिजे “ या वरुन हे सिध्द होते.

अहिल्यादेवीचे कार्य –विधवा महिलांना त्यांचा हक्क् मिळण्याकरीता अहिल्यादेवीने कायदयात बदल करुन पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला व मुल दत्तक घेण्याचा हक्क् देखील प्राप्त् करुन दिला.सर्वधर्मसमभाव मनी ठेऊन अखंड भारतामध्ये मंदिरे, विहीरी, तलाव ,रस्ते , पाणवटा, धर्मशाळा, वाटसरुसाठी पाणपोई,मशिद, चर्च, दर्गा,अनेक मंदिरांचा जीर्णीध्दार केला .शेतकरी सुखी तर सारे जग सुखी या संकल्पनेतून शेतक-यांच्या जाचक करातून मुक्त केले.शेतक-यासाठी सात-बारा हि संकल्पना राबवून त्याची चोक अशी अमलबजाणी करण्यास सुरुवात झाली,शेतक-यासाठी विविध योजना राबल्या गेल्या शेतक-यांचे जीवनमना सुधारीत करण्यासाठभ् व शेताच्या अन्न् धान्यायला चांगला मोबदला मिळवावे म्हणून बाजार पेठ सुरु केल्या व गांवगाडयात ही आढवडी बाजार पेठ ही संकल्पना रांबवून जनतेला सुखी समाधानी करण्याचे होऊ  लागले तसेच लोकामध्ये समानता राबावी या हेतूने आपल्या सैन्यामध्ये  पुरुषा बरोबर महिलांना ही संधी देऊ लागल्या अहिल्याबाईस राजमाता, पुण्याश्लोक ,लोकमाता तसेच इंग्रजी लेखक लॉरेन्स् यांनी भारताच्या “कॅथरीन द ग्रेट”एलिझाबेथ मार्गारेट असे म्हटले आहे. अहिल्यादेवी यांना  विविध पदव्यानी  गौरविण्यात आले.” ज्या प्रमाणे छं.शिवाजी महाराज हे जसे पुरुषामधले सर्व- उत्तम राजे होते,

तसेच आहिल्यादेवी ही स्त्रियांमधील सर्व-उत्त्म राज्यकर्ती होत्या राज्य कारभार करताना एका हातात *शस्त्र व  दुस-या हातात शास्त्र* घेऊन धर्मनिरपेक्षता,स्वातंत्रय, बंधुता ,समाता, न्याय या तत्वाप्रमाणे सलग २९ वर्षी राज्य् कारभार चालवला अशा महान आहिल्या मातेस  त्रि - शदाब्दी निमित्त कोटी-कोटी वंदन…


लेखक- श्री.प्रशांत अडसुळे ९३७३६२३६९२(राजमाता आहिल्यादेवी बहुउददेशीय सामाजिक संस्था कानेगांव)