मंठा प्रतिनिधी : दिगंबर सनईकर
मंठा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून झालेल्या मंठा तालुक्यातील अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रेट रस्त्याचे आमदार लोणीकर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.आमदार लोणीकर म्हणाले की ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोक कल्याणकारी योजनाचा लाभ मिळावा यासाठी आपण सदैव तत्पर असून ग्रामीण भागातील प्रत्येक गाव खेड्यातील विकासासाठी सदैव कटिबंध आहे.ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून भरघोस निधी यापूर्वी मिळालेला आहे. दरम्यान आमदार लोणीकर यांनी वाई आरडा तोलाची लावणी बेलोरा केंधळी पोखरी रानमळा लिंबे वडगाव या गावामध्ये भेटी घेऊन मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि समाज कल्याण योजना अंतर्गत विकास कामाचे भूमिपूजन केले व तसेच
वाई येथे आयोजित ग्राम दरबार कार्यक्रमात त्यांनी ग्रामस्थांनी संवाद साधला आणि समस्या जाणून घेतल्या. त्याप्रसंगी उपस्थित असलेले वाई गावचे सरपंच सुनील भाऊ ठाकरे सतीश निरवळ बाळू चौंडे गणेशराव खवणे शिवाजी जंजिरे राजेश मोरे लक्ष्मणराव उबाळे पंजाबराव बोराडे परमेश्वर उबाळे अजय अवचार विनायकराव मंडपे किशोर हनवते नामदेव मंडपे नाथा राव काकडे कैलास निमट आजी माजी सर्व गावकरी उपस्थित होते.



