Breaking

Sunday, May 11, 2025

श्री वेताळसाहेब यात्रेनिमित्त व सा.सोलापूर जनकल्याण च्या वर्धापन दिन रंगीत विशेषांकाचा प्रकाशन सोहळा वेताळ देवस्थान,मोडनिंब येथे उत्साहात संपन्न


मुख्य संपादक : संतोष पांढरे(मोडनिंब)

गेल्या चार वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात प्रकाशित होत असलेल्या सा.सोलापूर जनकल्याण या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त व मोडनिंब गावचे ग्रामदैवत श्री.वेताळसाहेब यात्रेनिमित्त सा.सोलापूर जनकल्याणच्या रंगीत विशेषांकाचा प्रकाशन सोहळा  रविवार दिनांक 11 मे रोजी मोडनिंब येथे वेताळ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुरण आण्णा गिड्डे, माजी सरपंच बाबूतात्या सुर्वे, उदय दादा माने, डाॅ. निशिगंधाताई कोल्हे, माजी सरपंच नागनाथ नाना ओहोळ, डाॅ.गोळवलकर, प्रकाश आण्णा गिड्डे, वैभव आण्णा मोरे, एकनाथ नाना सुर्वे, डाॅ.संजय लोखंडे यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी मुख्याध्यापक हरिदास जाधव सर, मुख्याध्यापक राजन सावंत सर, प्राचार्य पाटील सर,सतिश सुर्वे सर, शेखर सुर्वे सर, हनुमंत पाटोळे, राजेश निंबाळकर,मच्छिंद्र सोमासे, सुनील काळे,  शिवसेना गटनेते दीपक सुर्वे, अमोल गुरव, प्रल्हाद साळुंखे, चोपडे सर, ट्रस्टउपाध्यक्ष संभाजी लादे, ट्रस्टसचिव विजय खिलबुडे, हनुमंत यादव, मधू भाऊ मोरे, तेजस दादा जाधव, रामचंद्र पाटील, युवराज पवार, प्रेरणाताई तोडकरी, पत्रकार संभाजी वागज, पत्रकार संतोष पांढरे, पत्रकार बाळासाहेब ओहोळ, पत्रकार मारूती वाघ, पत्रकार अभिषेक पवार, वैभव ओहोळ, विलास तात्या गायकवाड, पंकज गायकवाड, अर्जुन बनसोडे सर, शिवाजी लोखंडे सर हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे आयोजन सा.सोलापूर जनकल्याणचे सहसंपादक प्राध्यापक संतोष लोकरे सर, संपादक विजयकुमार परबत, का.संपादक सतिश निंबाळकर सर, उपसंपादक साईदास चव्हाण यांनी केले.

यावेळी राजेश निंबाळकर यांच्याकडून सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. व उपस्थित मान्यवरांकडून सा.सोलापूर जनकल्याण च्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.