Breaking

Saturday, May 10, 2025

स्केटिंगपटू मनस्वी पिंपरेला खा. सुप्रियाताई सुळे यांची अनोखी मदत


आंतरराष्ट्रीय दर्जाचे Inline Skate Kit मनस्वी ला देताना खा. सुप्रियाताई सुळे

पुणे प्रतिनिधी : रविंद्र मोडक

दिनांक ९ मार्च २०२५ पुणे, कोंढवा बु., पुणे येथील सात वर्षीय हिंदरत्न कु. मनस्वी विशाल पिंपरे ही एक होतकरू आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू आहे. मनस्वीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह २४ विविध वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं असून, विविध स्केटिंग स्पर्धांमध्ये ११४ सुवर्णपदके, १७ विशेष पुरस्कार, आणि नॅशनल स्केटिंग चॅम्पियनचा मान मिळवला आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी कामगिरी करण्यासाठी मनस्वीला उच्च दर्जाच्या Inline Skate Kit ची गरज होती. मात्र तिचे वडील एका पायाने अपंग असून, पुण्यात छोटासा व्यवसाय करत असल्याने आर्थिक अडचणींमुळे हे शक्य होत नव्हते.ही परिस्थिती लक्षात घेऊन खा. सौ. सुप्रिया सुळे यांनी पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून १.३० लाख रुपये किमतीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे Inline Skate Kit मनस्वीला मदतीच्या स्वरूपात दिले. हे स्केट किट पुण्यात त्यांच्या स्वतःच्या हस्ते मनस्वीला प्रदान करण्यात आले.

यावेळी मनस्वीने आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं – "सुप्रियाताईंनी मला केवळ स्केटिंगसाठी मदत केली नाही, तर माझ्या स्वप्नांना गती दिली आहे. त्यांच्या या मायेच्या मदतीमुळे मी एक दिवस भारतासाठी ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकेन, हीच माझी त्यांना खरी परतफेड असेल."

मनस्वीला शुभेच्छा देताना खा. सुप्रिया ताई सुळे यांचे PA रश्मी ताई, सचिन भिसे सर, अमोल जगताप सर, मनस्वी यांच्या मातोश्री स्नेहा विशाल पिंपरे आणि वडील विशाल पिंपरे....

मनस्वी सध्या प्रशिक्षक विजय मलजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली २०२६ मधील राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत आहे. तिचं पुढील लक्ष्य आहे – एशियन गेम्स, ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिंपिक – जिथे ती भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याचा संकल्प बाळगून आहे.

मनस्वी ला शुभेच्छा देताना मच्छिंद्र तात्या गायकवाड ग्रामपंचायत सदस्य( वडकी) व रवींद्र (काका) मोडक(वडकी)

             खा.सौ.सुप्रिया सुळे यांचे प्रेरणादायी विचार....

"मुलांनी शिक्षणासोबतच खेळामध्येही सक्रिय राहणं फार गरजेचं आहे.खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहतं आणि शिस्त, आत्मविश्वास यांसारख्या अनेक जीवनमूल्यांचा विकास होतो.मनस्वीने आपल्या खेळाच्या माध्यमातून केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर पुणे शहराचे आणि महाराष्ट्राचेही नाव उज्ज्वल केलं आहे.तिच्या मेहनतीला आणि जिद्दीला माझा सलाम आहे.मला पूर्ण खात्री आहे की मनस्वी एक दिवस ऑलिंपिकमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकेल.तिच्या आई-वडिलांचं स्वप्न साकार होईल आणि आपल्या देशाचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवेल.पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तिच्या स्वप्नांना थोडीशी मदत करता आली,याचा मला मनापासून आनंद आहे."