मुख्य संपादक : संतोष पांढरे(मोडनिंब)
"ऑपरेशन सिंदूर'’ च्या ऐतिहासिक विजयाचा गौरव करण्यासाठी आणि भारतीय सैन्याच्या अद्वितीय शौर्याला मानवंदना देण्यासाठी मोडनिंब येथे माढा तालुक्याच्या वतीने आज उत्स्फूर्तपणे तिरंगा यात्रा काढण्यात आली.देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात घोषणा घुमत होत्या आणि परिसर राष्ट्रभक्तीच्या ऊर्जेने भरून गेला होता. भारतीय सैन्याने देशाच्या सीमांचे रक्षण करताना दिलेल्या पराक्रमाला ही तिरंगा यात्रा एक सलामी होती. आपल्या सैन्याने दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देत देशाचा गौरव वाढवला आहे.
ही तिरंगा यात्रा आपल्या वीर सैनिकांप्रती आदर व्यक्त करणारी आणि शहीदांना श्रद्धांजलीचं प्रतीक आहे.या तिरंगा रॅलीत प्रचंड पावसातही देशभक्त मोडनिंबकर व पंचक्रोशीतील देशभक्त ग्रामस्थ उपस्थित होते. तिरंगा रॅलीत मोडनिंब सह पंचक्रोशीतील सर्व पक्षाचे नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जय जवान... जय किसान, भारत माता की जय.... वंदेमातरम....हिंदुस्थान झिंदाबाद.... पाकिस्तान मुर्दाबाद.... अशा घोषणा देत या रॅलीची सुरुवात मोडनिंब बस स्थानक पासून झाली आणि समारोप ग्रामपंचायत कार्यालय,मोडनिंब येथे दोन मिनिटे मौन पाळून जे नागरिक व जवान शहिद झालेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीत घेऊन जयवंत समुद्र सरानी ह्या रॅली ला संबोधित केले.सरकारने हे सर्व श्रेय सैन्या ला दिले आहे.आपल्या भगिनींच कुंकू मिटवण्या चे काम पाकिस्तान ने केलंय त्याला त्याच शब्दात जवाब द्यायचे काम आपल्या सैन्यानी चोख केलंय ,म्हणून ह्या सैन्याच्या शॉर्याला मोडनिंबकरांनी भर पावसात उपस्थित राहुन सॅल्युट करून सलाम केला.
यावेळी ज्येष्ठ नेते मा.सभापती शिवाजी कांबळे, भाजपा माढा तालुका अध्यक्ष योगेश पाटील,जिल्हा कार्यकारणी सदस्य धनाजी लादे,किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश सुर्वे,बाबूतात्या सुर्वे,कैलास दादा तोडकरी, दत्ताबापू सुर्वे,संजीव शिंदे,मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे,माढा तालुका सरचिटणीस दत्ता जाधव, राहुल केदार,किसान मोर्चा अध्यक्ष नंदकुमार मोरे, सरपंच प्रतिनिधी राहुल पाटील,ओबीसी आघाडी तालुका उपाध्यक्ष शहाजी माळी, शहाजी यादव, महेश मते, अमोल काटकर, विशाल पाटील,सुभाष सुर्वे, शितल महाडिक, अभिजीत महाडिक, अमर महाडिक, संतोष पाटील सर, डॉक्टर संतोष दळवी, बालाजी भाऊ पाटील, उपसरपंच अमित कोळी, जयवंत समुद्र सर, महिला तालुका अध्यक्ष माया माने, वेताळ परिवाराचे प्रकाश अण्णा गिड्डे,अनिल आप्पा शिंदे, मेजर अर्जुन माने,संध्या कुंभेजकर, विवेक कुंभेजकर, शहाजी भांगे, गोटू शिंदे, माणिक कणसे,विजय परबत, बच्चु गोरे,राजेश निंबाळकर,संतोष पांढरे,अनिल मोरे, मोकाशी गुरुजी, विरेन कुलकर्णी,बाळासाहेब गडधरे,कुर्मुदास पाटील,अभिषेक पवार,चंद्रकांत लोकरे,उदय जाधव,महेश पाटील, तसेच सर्व पदाधिकारी,नागरिक,सर्व पत्रकार बंधु आणि पोलिस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





