पुणे प्रतिनिधी : रवींद्र मोडक
दि.22 मे 2025 पाटस (ता.दौंड) येथे "अंधत्वाकडून दृष्टिकडे" या मुक्त अभियानांतर्गत नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, पाटस यांच्या वतीने आणि के.के.आय. इन्स्टिट्यूट, साधुवासवानी मिशन संचलित बुधराणी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. जून २०१६ पासून दर महिन्याच्या २० तारखेस अखंडपणे हे मोफत शिबीर राबवले जात आहे.२० मे २०२५ रोजी आयोजित शिबिरात एकूण ५५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३९ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.
२२ मे २०२५ रोजी (गुरुवार) या रुग्णांपैकी २६ रुग्णांना पुढील उपचारासाठी पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. याशिवाय, ५ रुग्णांना अल्प दरात चष्मे वितरित करण्यात आले आणि एक रुग्ण अधिक उपचारासाठी हॉस्पिटलला रेफर करण्यात आला.या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत, म्हणजे मे २०२५ अखेर, एकूण ८१७६ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ५३९२ रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच २६७५ रुग्णांना अल्प दरात चष्मे वाटण्यात आले आहेत.या शिबिरासाठी श्री. पाटील साहेब, श्री. शिर्के साहेब, श्री. गाढवे साहेब व बुधराणी हॉस्पिटल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिरावेळी नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष व नेत्रमित्र डॉ. पांडुरंग श्रीपतराव लाड उपस्थित होते.



