मोडनिंब वेताळ बाबा यात्रा म्हणजे ज्ञानवृद्धी,संस्कृती चा अनुभव, मनोरंजन आणि आत्मिक तृप्तीचा आनंदच.
मुख्य संपादक : संतोष पांढरे
मोडनिंब गावाचे ग्रामदैवत श्री वेताळ देवस्थान यात्रेस यंदा शनिवार दि.10 मे 2025 पासून सुरुवात झाली होती.सलग सहा दिवस यात्रेनिमित्त नानाविविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.खरोखरच दरवर्षी ची वेताळ बाबा ची यात्रा ही स्मरणीय च राहते.मोडनिंब ची यात्रा म्हणजे आनंदाची पर्वणीच. गावातील सगळ्यांचे नातेवाईक,मित्रमंडळी दूर-दुरून येतात.यात्रेआधी आठवडाभर गावात उत्साह असतो.
देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी वाजत गाजत शेरण्या ह्या सोंगाच्या गाड्या चालू होईपर्यंत म्हणजे 8 वाजेपर्यंत दिवसभरच डीजेचा ताल व नृत्यांगना ,हलगी,लेझीम,झांजपथक,संबळ ह्या सर्व गोष्टींचा समावेशक असलेल्या वेगवेगळ्या मंडळाच्या शेरण्या आपला नैवेद्य-महानैवेद्य वेताळ बाबा ला घेऊन जातात. यात्रे तील खास आकर्षण म्हणजे सलग तीन दिवस चालणाऱ्या पारंपरिक, डिजिटल व आधुनिक अशा सोंगाच्या गाड्या. नेहमीच। प्रामुख्याने सोंगाच्या गाड्यांसाठी पुढाकार घेणारे मोडनिंब चे आर्टिस्ट सौदागर शिंदे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व सोगांच्या गाड्यांची टीम यांची तयारी जवळपास यात्रा चालू होण्याआधी एक ते दीड महिन्या अगोदरच चालू करतात.परिश्रम करणारे हे युवक हे वेगवेगळ्या व्यवसायातील असून त्या कालावधी मध्ये आपला व्यवसाय बंद ठेवून सोंगाच्या गाड्याची तयारी करण्यासाठी मग्न असतात.
यंदाचा अफलातून असा नरसिंहा,मोहित करणारा असा डायनसोर, 15 फुटी कोंबडा व सोबत 10-12 फुटाचे 5 कोंबडे , नाविन्यपूर्ण अशा चार मोठ्या कट पुतल्या ह्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.




