मुख्य संपादक : संतोष पांढरे
यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा मोडनिंब येथील शाखेच्या अधिकाऱ्याकडून सामान्य युवा उद्योजक यांना कर्जासाठी मानसिक त्रास होत आहे.समस्त मोडनिंबकर जनतेनी व्यापारी वर्गानी शाखेवर विश्वास ठेवत गेली अनेक वर्ष व्यवहार केले परंतु त्याच व्यापाऱ्यांना कर्ज देताना अनेक अडचणी चा सामना करावा लागत आहे.ग्राहक सेवा केंद्रासाठी अनेक लोकांनी अर्ज करूनही त्यांना विनाकारण टाळाटाळ अधिकारी करत आहेत कर्ज घेण्यासाठी काही पुढाऱ्यांच्या शिफारशी लागत आहेत.ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असूनही त्यांनाच अडथळा करत आहेत.अनेक लोकांना बोगस कर्ज वाटप केले आहेत. काही लोकांकडून कमिशन घेऊन त्यांचे कर्ज प्रकरण यांनी केले आहेत.या अन्याया विरोधात मी १९-०५-२०२५ रोजी यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा मोडनिंब येथे आत्मदहन करणार आहे.असे अँड.विजयसिंह गिड्डे यांनी सांगितले आहे.


