Breaking

Saturday, May 31, 2025

जिल्हाधिकाऱ्यांना मल्टिपल लॉग इन देण्यासंदर्भात महा.ई.सेवा केंद्रचालकांचे निवेदन


मुख्य संपादक : संतोष पांढरे(मोडनिंब)

नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेसाठी विविध दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयांना व आपले सरकार सेवा (महा.ई.सेवा) केंद्रांमध्ये विद्यार्थी पालकांची गर्दी होत आहे. परंतु, सर्वच तहसिल कार्यालयातील सेतू केंद्र व आपले सरकार सेवा (महा.ई.सेवा) केंद्रामधेच  एकच लॉगिन असल्याने दाखले जलदगतीने देण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व सेतू कार्यालयांना व आपले सरकार सेवा (महा.ई.सेवा) केंद्रांना मल्टिपल लॉगिन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना माढा आपले सरकार सेवा (महा.ई.सेवा) केंद्रचालकांनी निवेदन दिले आहे. 

सध्या दहावी बारावीचे निकाल लागल्यामुळे पुढील शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेच्या तयारीला वेग आला आहे. त्यासाठी आवश्यक विविध दाखले काढण्यासाठी विद्यार्थी पालकांची लगबग सुरु आहे. त्यामुळे सेतू कार्यालयांना व आपले सरकार सेवा (महा.ई.सेवा) कार्यालयाच्या केंद्रांमध्ये विविध दाखल्यांसाठी गर्दी होत आहे. परंतु, सर्वच आपले सरकार सेवा केंद्रांसाठी एकच लॉगिन असल्याने दाखले जलदगतीने देण्यात अडचणी येत आहेत. एकाच व्यक्तीच्या नावे लॉगिन असल्याने त्यावर अतिरिक्त ताण येत आहे. सेतू कार्यालयांना व आपले सरकार सेवा (महा.ई.सेवा)  केंद्रांना मल्टिपल लॉगिन उपलब्ध करून दिल्यास सर्व दाखले जलद मिळून विद्यार्थी व पालकांची गैरसोय दूर होणार आहे. दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता पुढील प्रवेशासाठी केवळ ऑनलाइन प्रवेश हा एकच पर्याय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध ठेवला आहे. त्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रांमधून दाखले गोळा करताना विद्यार्थी, पालकांना मोठी धावपळ करावी लागत आहे. मात्र, सर्व्हरची गती संथ असल्यामुळे सेतू केंद्र चालकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. ११वीचे अर्ज भरण्यासाठी ३ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. सर्व्हरची गती संथ असल्यामुळे दिवसभरात फक्त चार ते पाच दाखले ऑनलाइन होत असल्याची सेतू कार्यालयांना व आपले सरकार सेवा (महा.ई.सेवा) केंद्र चालकांनी माहिती दिली. सर्व्हरची गती संथ असल्याने विद्यार्थी व सेतू केंद्रचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.यावरती लवकर पर्याय काढावा असे  सेतू कार्यालय व आपले सरकार सेवा (महा.ई.सेवा) केंद्र चालकांची विनंती आहे.