दौंड-भिगवण प्रतिनिधी : अक्षय वरकड
दौंड तालुक्यातील यवत मधील माणकोबावाडी येथे नाथदेवराई फाउंडेशन व आनंदी जीवन फाउंडेशन यांच्या वतीने समस्त ग्रामस्थ माणकोबावाडी यांच्या उपस्थितीत देशी वृक्षांचे वृक्षारोपण करत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित महिला यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. महापुरुषांचे विचार हे आचरणात आणले गेले पाहिजे हिच विचारसरणी रुजवत गेली अनेक वर्ष माणकोबावाडी येथे वृक्षारोपण करत जयंती साजरी करण्यात येते. या वर्षीही देशी वृक्षांचे वृक्षारोपण करून अहिल्यादेवींच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. यासाठी आनंदी जीवन फाउंडेशन चे अध्यक्ष मोसीन पठाण यांनी देशी झाडे भेट दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाथदेवराई फाउंडेशन सदस्य राहुल बिचकुले यांनी केले तसेच सदस्य पोपट लकडे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल उपस्थिस्तितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मोसीन पठाण यांनी अहिल्यादेवी यांचे विचार आणि वृक्षारोपण काळाची गरज याचे महत्व पटवून दिले तसेच सामाजिक कार्यकर्ते मनोहर खताळ यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर सर्वांनी मिळून सर्व झाडांचे सिद्धनाथ मंदिर व माणकोबावाडी परिसरात वृक्षारोपण केले.यावेळी सिद्धनाथ तरुण मंडळ अध्यक्ष मारुती बिचकुले, सा.कार्यकर्ते धुळा भिसे, ग्रा.प. सदस्य नंदा बिचकुले, उद्योजक मोहन माळवे, माऊली लाटकर, युवा उद्योजक दिपक खताळ, सोमनाथ खुपसे, प्रशांत पिंगळे, अमोल खताळ, दत्ता पिंगळे, माऊली खताळ, दादा भिसे, संदीप शिंदे, बापु खताळ, बापु लकडे, दत्तात्रय बिचकुले, भाऊ भिसे, संपत भिसे, असिफ शेख, राजेंद्र बिचकुले, गणपत बिचकुले,गणेश खताळ,विशाल खताळ, रामा खताळ याबरोबरच माणकोबावाडी ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या.


