Breaking

Saturday, May 31, 2025

१२५ केव्हीए क्षमतेचा सोलार प्लॅन्ट उभारणीसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला भारतीय स्टेट बँकेकडून ३० लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश


मुख्य संपादक : संतोष पांढरे(मोडनिंब)

भारतीय स्टेट बँकेचे चेअरमन सी. एस. शेट्टी यांनी रविवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे विभागप्रमुख संजय कोकीळ यांनी चेअरमन शेट्टी यांचा श्रींची मूर्ती व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी भारतीय स्टेट बँकेचे चेअरमन सी. एस. शेट्टी यांनी मंदिर समितीस बँकेच्या सीएसआर फंडातून १२५ केव्हीए क्षमतेचा सोलार प्लॅन्ट उभारणीसाठी ३० लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश मंदिर समितीस दिला असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. या देणगीमधून सौर ऊर्जेचा प्रकल्प बसविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आणखी निधीची आवश्यकता भासल्यास तेही दिली जाणार आहे.

यावेळी सहायक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी, युरोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक, भारतीय स्टेट बँकचे अरविंद कुमार, श्रीराम सिंग, सतीश कुमार, पंकज बर्नवाल, आनंदकुमार पाटकर तसेच पंढरपूर शाखेचे मुख्य प्रबंधक आश्रय दीक्षित,प्रबंधक राहुल गाडेकर, होम लोन पंढरपूर शाखेचे अधिकारी नागेश तोडकरी, बँक कर्मचारी एकनाथ वसेकर सागर गायकवाड अभिजीत इंगळे उपस्थित होते.