मावळ प्रतिनिधी : मंगेश आखाडे
वडगाव मावळ रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एस.एस.सी. परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२४-२०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला. विद्यालयाने या वर्षी मागील सर्व वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढत १०० टक्के निकाल लावून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.इयत्ता १० वी च्या परीक्षेसाठी १८४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.त्यापैकी DISTINCTION मध्ये ५९ विद्यार्थी , GRADE I मध्ये ७७ विद्यार्थी , GRADE II मध्ये ३९ विद्यार्थी , PASS GRADE ९ विद्यार्थी असे एकूण १८४ विद्यार्थ्यांपैकी १८४ विद्यार्थी पास झाले असून ९० % वर गुण ८ विद्यार्थ्यांनी मिळवलेले असून प्रथम क्रमांक कु.घोडे प्रीती दगडू ९६.००% , द्वितीय क्रमांक कु.म्हेत्रे हर्षदा बाळकृष्ण ९४.००% तर कु.रायकर कार्तिकी संदीप हिने ९३.००% गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक मिळवलेला आहे.
विद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये SSC निकालात अत्तुच्च कामगिरी करून अतुलनीय असे यश संपादन केलेले आहे. या यशामध्ये या विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे मराठी :- श्री.गोडे टी.एस., सौ.भोसले जे.एन. हिंदी :- सौ.गायकवाड पी.पी., सौ.ढमाले पी.एस., इंग्रजी:- सौ.भोसले एम.बी., श्रीम.शेटे एन.एन., श्री ढवळे पी.एस. , गणित :- श्री.हाके एस.व्ही,श्री.फडतरे एन.एच., सौ.अत्तार एस.एस., श्रीम.साळुंखे व्ही.आर.,विज्ञानतांबेएस.एस.,फुलसुंदर,व्ही.जी.गीते,एस.आर,समाजशास्त्र:-इंगळे पी.पी.,V3 :-वाघमारे सर या सर्व अध्यापकांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.हाके सर यांनी सांगितलेल्या नियोजनानुसार साप्ताहिक चाचण्या ,अतिरिक्त जादा तास , TOP 15 निवड या विविध मार्गांचा वापर करून वतसे काटेकोर नियोजन मुख्याध्यापकांनी केल्यामुळे विद्यालयाचा निकाल हा अतिशय उत्कृष्ठ म्हणजे १००% लागलेला आहे.
विद्यालयाच्या या यशाबद्दल मा.प्राचार्य हाके एस.व्ही., उपप्राचार्य मोहिते एस.आर., पर्यवेक्षिका गायकवाड पी.पी , तसेच विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्था पश्चिम विभागीय अधिकारी संजय मोहिते साहेब , सहाय्यक विभागीय अधिकारी दत्तात्रय गायकवाड , स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन व सदस्य , शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक संघ, माता पालक संघ,माजी विद्यार्थी संघ, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या




