Breaking

Sunday, September 7, 2025

मोडनिंब येथील महाराष्ट्रातील पहिल्या चतुर्मुख 1008 मुनीसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरात पर्युषण पर्वाचा भव्य समारोप


मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)

मोडनिंब येथील महाराष्ट्रातील प्रथमच चतुर्मुख 1008 मुनीसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर मध्ये आज (रविवार) पर्युषण पर्वाचा समारोप भव्य पालखी काढून करण्यात आला. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या धार्मिक पर्वामुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला.

पर्वाचा विशेष कार्यक्रम

गेल्या दहा दिवसांत मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये मोडनिंब येथे प्रथमच गर्भ संस्कार शिबिर आयोजित करून गर्भवती महिलांसाठी मार्गदर्शन केले गेले. तसेच भक्ताम्बर अनुष्ठान पार पडले आणि पंचमेरू विधान आयोजित करण्यात आले. सौ. माधवी दोशी यांनी पंचमेरूचे पाच उपवास करून या पर्वाला विशेष अध्यात्मिक महत्त्व प्राप्त केले.या काळात महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. आचार्य भक्ती स्पर्धा ने महिलांमध्ये अध्यात्मिक उत्साह निर्माण केला. दररोज सकाळी अभिषेक, पूजा, संगीत आरती यामुळं मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने भरून गेला.

मार्गदर्शन व सहकार्य

सर्व उपक्रमांचे मार्गदर्शन पंडित सुधीरजी शास्त्री यांनी केले. याशिवाय कार्यक्रमाच्या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. विशालजी मेहता, उपाध्यक्ष अरविंदजी गुरसाळकर, विश्वस्त सुरेश गांधी, सुनीलजी पूरवत यांच्यासह अभिनंदन मेहता, निलेश गुरसाळकर, बाळू गुरसाळकर, बुवा गुरसाळकर, रत्नदीप मेहता, शैलेश दोशी, सुहास दोशी, बाहुबली दोभाडा, अतुल खडके, अरुण कळसकर, संकेत पुरवत, अजित खडके, रोहित गांधी आदींनी अथक परिश्रम घेतले.यासोबतच नवकार महिला मंडळ तसेच सौ. वृषाली मेहता, सौ. सुजाता गुरसाळकर, सौ. अश्विनी बाभळे यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.

पालखी सोहळा व भक्तांचा सहभाग

आज दहाव्या दिवशी पार पडलेल्या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले. पालखी काढताना भक्तांनी नयनरम्य वातावरणात भक्तिभावनेने मंदिर परिसर सजवला. सोहळ्यादरम्यान भजन, कीर्तन, आरती आणि पूजा या सर्व विधींनी भक्तांना आध्यात्मिक समाधान लाभले.

मंदिराचे प्रशासन आणि संस्थेच्या सदस्यांच्या परिश्रमामुळे पर्युषण पर्वाचे कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडले आणि मोडनिंब गावाच्या धार्मिक व सांस्कृतिक जीवनात हा एक ऐतिहासिक क्षण ठरला.