स्मार्ट प्रकल्प अंतर्गत अरणमध्ये " फळप्रक्रीया "उद्योगाची उभारणी संबंधीत जागतिक बैंक अधिकाऱ्यांची समुल कंपनीला भेट
माढा : संतोष पांढरे(मोडनिंब)
दि.२२/०२/२०२५ रोजी जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी समुल फार्मर प्रोड्युसर कंपनीला भेट दिली. यावेळी कंपनीच्या स्वच्छ आणि प्रदुषण मुक्त परिसराची पाहणी केली. कंपनीच्या पारदर्शी नियोजना बद्दल कंपनीचे कौतुक केले. सभासदांना काही प्रश्न विचारून त्यांना बोलते केले. या प्रसंगी जागतिक बँकेचे अरबिंद झांब चारुलता शर्मा, भारसिया गुप्ता, वनिता कोम्पू यांनी मार्गदर्शन केले. यांच्यासह स्मार्ट चे अतिरिक्त प्रकल्प संचालक उदय देशमुख,प्रकल्प अंमलबजावणी अधिकारी गुलाबराव भदाणे,नोडल अधिकारी मदन मुकणे या सर्व अधिकाऱ्यांनी कंपनीस भेट देऊन पूर्णत्वास येत असलेल्या कामा संदर्भात समाधान व्यक्त केले. या बरोबर अधिकाऱ्यांनी कंपनीचे भागधारक व शेतकऱ्यां समवेत विविध प्रश्नांवर चर्चा केली. या वेळी समुलचे संस्थापक सौ वैशाली बालाजी गाडेकर ,चेअरमन देविदास सोपान काळे ,व्हा. चेअरमन सुषमा कोल्हाळे, संचालक किर्ती साठे, हिमानी कातकर, उमाजी देवकर मोहन भोसले, यांच्यासह सभासद शेतकरी उपस्थित होते.स्मार्ट प्रकल्प अंतर्गत अरणमध्ये " फळप्रक्रीया "उद्योगाची उभारणी संबंधीत जागतिक बैंक अधिकाऱ्यांची समुल कंपनीला भेट दिली.
ही मुल्यसाखळी विकसीत करण्यासाठी समुल कडून परदेशातुन फुड प्रोसिसिंग लाईन, डायसिंग लाईन,कटिंग लाईन आदि मशीनही मागविण्यात आल्या आहेत.स्मार्ट प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र शासनाने भरीव मदत केली आहे असे प्रतिपादन बालाजी गाडेकर,कार्यकारी संचालक,समुल यांनी केले.यावेळी वृक्षारोपण ही करण्यात आले.
या अगोदर ही १४ डिसेंबर रोजी उपप्रकल्प उभारणी स्थळी श्री चंदनशिवे उपसचिव कृषी मंत्रालय यांनी नोडल अधिकारी श्री मदन मुकणे साहेब सोबत कंपनीचे CEO श्री बालाजी बबन गाडेकर व डायरेक्टर देविदास सोपान काळे उमाजी निवृत्ती देवकर बाळासाहेब भगवंत नाईकुडे सौ वैशाली बालाजी गाडेकर दीपक हरिभाऊ जाधव यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते.



