Breaking

Wednesday, March 12, 2025

महिला दिनानिमित्त सम्राट अशोक विद्यामंदिर,कर्वेनगर येथे पालक मेळाव्याचे आयोजन




पुणे प्रतिनिधी : रवींद्र मोडक

सम्राट अशोक विद्यामंदिर, मनपा शाळा क्रमांक 117 बी, कर्वेनगर येथे महिला दिनानिमित्त पालक सभा व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय पर्यवेक्षिका अरुणा राहींज मॅडम होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. रेश्मा संतोष बराटे, सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या. तसेच दामिनी पथक व पोलीस दादा यांचीही विशेष उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका ठाकूर मॅडम यांच्या प्रास्ताविकाने झाली. यानंतर दामिनी पथक, अरुणा राहींज मॅडम व रेश्मा बराटे ताई यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. अडसूळ सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन केले.महिला दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये संगीत खुर्ची, आंधळी कोशिंबीर, पाककला स्पर्धा आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा यांचा समावेश होता. पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि आनंद लुटला.विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेले प्रयोग पाहून पालकांनी कौतुकाची थाप दिली. विविध स्पर्धांतील विजेत्यांना अरुणा राहींज मॅडम व रेश्मा बराटे ताई यांच्या हस्ते गौरविण्यात आले.संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आणि उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी याचा मनमुराद आनंद घेतला.