मोडनिंब प्रतिनिधी:
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्त मोडनिंब (ता.माढा) सकल हिंदू समाजाच्या वतीने येथे २८ फेब्रुवारी ते २९ मार्च,फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्यापर्यंत धर्मवीर बलिदान मास साजरा करून छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण व आदरांजली वाहिली जात आहे. बलिदान मासात रोज सायंकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे नित्य पूजन व स्मरण करण्यात येणार आहे.युवकांनी सामूहिक मुंडण करून संभाजी महाराज यांना आदरांजली वाहिली आहे.छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता इतिहास आहे . छत्रपती श्री संभाजी महाराज मृत्युच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावर पुर्ण महिनाभर अति धीरोदत्तपणे देहत्याग करीत होते. त्यामुळेच छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान, त्यांनी सहन केलेल्या मरणयातना याची प्रत्येक हिंदू मनाला जाणीव होण्यासाठीच समस्त शिवशंभू पाईकांकडून हा बलिदान मास पाळण्यात येत आहे.लहानासह युवकांपैकी अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे बलिदान मास पाळण्याचा नियम केला आहे. यामध्ये काही तरुणांनी दिवसातून एक वेळा जेवण करणे,काहींनी चप्पल वापरणे बंद केले,काहींनी मुंडण केले,काही युवकांनी मिष्ठान्न तसेच गोड खाणे तर काहींनी मांसाहार बंद केला आहे.दररोज ६० युवकांकडून श्री संभाजी सूर्यहृदय श्लोकाचे वाचन छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर ग्रामपंचायत कार्यालया समोरील प्रांगणात जवळपास दररोज ६० ते ७० युवक नित्यनियमाने उपस्थीत असतात.कार्यक्रमाची सुरवातीस प्रेरणा मंत्र म्हटला जातो. श्री संभाजी सूर्यहृदय श्लोकाचे वाचन करून याचा अर्थ सांगितला जातो. ध्येय मंत्र व प्रतिज्ञेने सांगता होते.


