Breaking

Saturday, March 15, 2025

होळी व धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रण शाखा तासगांव कडून बेजबाबदार वाहनचालकांच्यावर कडक कारवाई.


तासगाव :-रणजीत थोरबोले.

धुलिवंदन व होळीच्या पार्श्वभूमीवर तासगांव वाहतूक नियंत्रण शाखेची धडक कारवाई शुक्रवारी तासगांव करांनी अनुभवली.

यामध्ये M.V.Act अंतर्गत फॅन्सी नंबर प्लेट 6केस 4000₹दंड,ट्रिपल सीट 9केस 9000₹दंड लायसेन्स जवळ न बाळगणे 30केस 17700₹दंड, विना हेल्मेट 3केस 3000₹दंड, वाहन चालवत असताना मोबाईलचा वापर 6केस 6000₹दंड, मोवाका इतर केसेस 32,नो पार्किंग 6केसेस 3700₹दंड, ड्रॅंक अँड ड्राईव्ह 6केसेस (4गुन्हे दाखल +02खटले )न्यायालयात दाखल केले गेले.एकूण 86 केसेस च्या माध्यमातून 59500 रु दंड करण्यात आला असून त्यामध्ये पेड 37 केसेस च्या माध्यमातून 24500 रु दंड वसुल केला आहे.सदरची कारवाई करत असताना API यादव साहेब, सहाय्यक पोलीस फौजदार सुनील होळकर, तसेच कर्मचारी श्री गणेश कोने,नागरगोजे,संदीप भंडारे, आडके, आणि होमगार्ड यांनी प्रत्यक्ष ही दंडात्मक कारवाई केली.

अशीच कारवाई पुढील काळात चालू राहील असेही सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र यादव साहेब यांनी स्पष्ट केले आहे. या कारवाई बद्दल नागरिकांनी पोलीस यंत्रणेचे कौतुक केले आहे.