मोडनिंब : संतोष पांढरे
मोडनिंब येथे दीड दिवसीय वैष्णव मेळावा आयोजित करण्यात आला होता. वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपत रामा सुरवसे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोडनिंब येथील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात दीड दिवसीय वैष्णव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा यांच्या कृपाआशिर्वादाने हरिभक्त परायण गुरूवर्य चंद्रहार जाधव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा वैष्णव मेळावा आयोजित करण्यात आला होता.
12 मार्च रोजी या वैष्णव मेळाव्यास सुरुवात झाली. प्रवचन, हरिपाठ तर रात्री आठ ते दहा या वेळेत गुरूवर्य तुकाराम महाराज घुगे यांची किर्तन सेवा संपन्न झाली. तर गुरूवारी 13 मार्च रोजी सकाळी सात ते आठ चिंतन व सकाळी दहा ते बारा या वेळेत ओंकार महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने या वैष्णव मेळाव्याची सांगता झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या वैष्णव मेळाव्यास मोडनिंब व परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी संत श्रीपाद माऊली वारकरी शिक्षण संस्था व संत श्रीपाद माऊली साधक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.





