Breaking

Saturday, March 15, 2025

मा.मुख्यमंत्री साहेबांना महाराष्ट्र राज्यात धनगर (ST) आरक्षण लागू करणेबाबत चे राष्ट्रीय धनगर सेनेचे निवेदन


सोलापूर प्रतिनिधी

गेल्या 75 वर्षांपासून धनगर समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेवून येथील राजकारणी आणि काही समाज कंठकांनी या धनगर जमातीला आपल्या मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे.धनगर जमात ही महाराष्ट्र राज्यात अनुसुचित (ST) जमातीत येते. परंतु शासनाचे आदेश नसल्यामुळे प्रशासन धनगर जमातीला (ST) अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र देत नाहीत.तरी आपण ज्या धनगर व्यक्ती च्या महसुली नोंदी धनगर नावाने आहेत अशा धनगर व्यक्तींना अनुसुचित (ST) जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्यावेत अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय धनगर सेनेने मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणीस साहेब यांना देऊन नम्र विनंती केली आहे.

आपण कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहात. आपण आजपर्यंत अनेक निर्णय ऐतिहासिक आणि धडाडीचे निर्णय घेतलेले आम्ही पाहिलेले आहेत.या ही बाबतीत आपण धनगर समाजांना योग्य तो न्याय या बाबतीत द्यावा असेही राष्ट्रीय धनगर सेनेचे संस्थापक  अध्यक्ष श्री आकाश पुजारी यांनी म्हंटले आहे.