भिगवण प्रतिनिधी : अक्षय वरकड
संजीवनी आणि इन्स्पायर मी फाउंडेशन व श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या वक्तृत्व स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आल्या होत्या.
इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटामध्ये त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे जुनिअर कॉलेज टाकळीचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी स्वराज रविंद्र दवणे याचा प्रथम क्रमांक आला तर इयत्ता आठवी ते दहावीच्या गटामध्ये श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल कोर्टी चा विद्यार्थी तनवीर रविंद्र दवणे यास द्वितीय क्रमांक मिळाला.
बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील , शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ढेरे साहेब, संजीवनी इन्स्पायर मी चे संस्थापक अध्यक्ष चोपडे सर विद्यालयाचे मुख्याध्यापक विटकर सर, गोरख ढेरे सर, सकाळचे पत्रकार श्री काळे सर श्री बरडे सर आदी उपस्थित होते.



