Breaking

Tuesday, March 25, 2025

भारतीय जैन संघटना शासनाच्या "गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार",या योजने साठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सहकार्य करणार.


राज्य अध्यक्ष व पदाधिकारी यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

मुख्य संपादक : संतोष पांढरे

 सोलापूर जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यात "गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार" ही योजना राबविण्या साठी सोलापूर चे जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद यांची राज्य अध्यक्ष केतनभाई शहा सोबत सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.बिजेएस तर्फे मागील वर्षी राज्यातील 30,000 गावांना भेटी देऊन 10,900 ग्रामपंचायती मधून गाव तलावातील गाळ काढण्या साठीचे मागणीपत्र भरून ते सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले होते.

ह्या वर्षी देखील बिजेएस यांनी शासनास ह्या कामा साठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सहकार्य करण्याचे ठरवले व संस्थापक शांतीलालजी मुथा यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडवणीस सोबत एक सामंजस्य करार ( MOU ) मंत्रालयात करण्यात आला आहे.राज्यातील पाण्यासाठी काम करणाऱ्यांची सर्व 36 जिल्ह्यात तालुकानिहाय समन्वयकांची नेमणूक केली आहे. त्या सर्व समन्वयक व पदाधिकारी यांची पुणे येथे एक बैठक लावली. त्या मध्ये राज्यभरातुन 150 पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.त्या वेळेस शासनास आपण कसे सहकार्य करणार आहोत त्यासंदर्भात दिवसभर कार्यशाळा घेण्यात आली.मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्या मधील सर्व ग्रामपंचायतीस आमचे कार्यकर्ते 11 जलरथ सोबत जाऊन मागणीपत्र भरून घेत होते व पोस्टर लावून जनजागृती करत होते.अश्या 244 ग्रामपंचायती ची मागणी पत्रे भरून शासना कडे जमा केली त्या पैकी 126 तलावतील गाळ काढण्याची शासन मान्यता देखील मिळाली असून तेथे काम पूर्ण होत आहेत.ह्या वर्षी देखील शासनास बिजेएस ने एक पोर्टल तयार करून ते शासनाच्या जलसंपदा मंत्री संजय राठोड यांना सुपूर्त करण्यात आले आहे.त्या ऑनलाइन कार्यक्रमात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी,सीईओ,आरडीसी व जलसंपदा अधिकारी व  बिजेएस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य अध्यक्ष केतनभाई शहा यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंचांना आवाहन केलेआहे की आपण शासनाच्या www.shivar.com ह्या वेबसाईट वर जाऊन ह्या योजनेची संपूर्ण माहिती घेऊन बिजेएस ने सुहाना मसाला यांच्या सहकार्याने तयार केलेल्या पोर्टलवर फॉर्म भरून द्यावा.जेणे करून आपल्या गावातील तलाव,बंधारा,नाला ह्या मधील गाळ काढून तो गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य आपल्या शेतात घेऊन जायचा आहे.अल्पभूधारक शेतकऱ्यांना वाहतुकी साठी राज्य शासन अनुदान देखील देणार आहे,ह्या योजने मुळे आपल्या गावातील पाणी साठा वाढेल व मनुष्य, प्राणी पक्षी तहान भागेल तसेच शेतात गाळ टाकल्याने शेतकऱ्याची जमीन सुद्धा सुपीक होईल व उत्पन्न वाढेल.

दि 24 मार्च सोमवार रोजी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार/ नाला खोलीकरण योजनेची सविस्तर चर्चा जिल्हाधिकारी सोबत झाली. त्यांनी त्वरित नोडेल ऑफिसर म्हणून जलसंपदा अधिकारी श्री दामा साहेबांची नियुक्ती केली.व सर्व संबधित विभाग अधिकाऱ्यांची एक मिटिंग लावून कामाचे नियोजन करुन कार्य लवकरच सुरू करु असे सांगितले.या वेळेस राज्याध्यक्ष केतनभाई शहा, राज्यसचिव संतोष बंब ,राज्य कार्यकारणी सदस्य श्याम पाटील, प्रवीण कुमार बलदोटा, जिल्हा समन्वयक विशाल मेहता,विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभुते ,महेश कोकीळ, विभागीय महिला अध्यक्ष माया पाटील, जिल्हाध्यक्ष देशभूषण वसाळे, जिल्हा सचिव प्रशांत वर्धमाने, जिल्हा सदस्य विक्रांत बशेट्टी, कोमल पाचोरे. आदींची उपस्थिती होती.