Breaking

Wednesday, March 12, 2025

फलटण येथे सातारा जिल्हा पोलीस दला च्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा भव्य नागरी सत्कार



फलटण प्रतिनिधी : आप्पासो तांबे

मला मिळालेल्या राष्ट्रपती पदकाच्या निमित्ताने माझा सत्कार करावा अशी येथील नागरिकांची इच्छा होती. या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधता येईल, त्यांच्याशी काही हितगुज करता येईल याच उद्देशाने आज आपण फलटण येथे आलो आहोत.जरी मला राष्ट्रपती पदक मिळाले असले तरी गेल्या ३३ वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्यासोबत पोलीस दलातील जे अधिकारी कर्मचारी होते, त्यांचेच या पदकामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. गेल्या ३३ वर्षांमध्ये मी जे कार्य करू शकलो त्यामध्ये या सर्वांचा सहभाग होता, म्हणूनच माझी सेवा वैशिष्ट्यपूर्ण आहे असे भारत सरकारला वाटले आणि त्याचा गौरव माननीय राष्ट्रपतींनी केला, असे स्पष्ट करून फुलारी म्हणाले.समाजामध्ये केवळ पोलीस च शांतता, सुव्यवस्था अथवा संनियंत्रण ठेवू शकत नाहीत त्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक व अपेक्षित असते.नागरिक, विद्यार्थी, महिला यांच्याबरोबर आमचा सातत्यपूर्ण संवाद राहायला हवा यासाठी आम्ही नेहमीचआम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. समाजातील घटकांना आमच्याकडून वेळोवेळी मदत झाली पाहिजे. जर पोलीस दलातील कोण चुकत असेल तर ते माझ्या अथवा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आपण निदर्शनास आणू शकता. महाराष्ट्र शासनाने सध्या सातसूत्री कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये शासनाची सर्व खाती व त्यांचे अधिकारी यांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. या मधून स्पर्धा घेऊन राज्यभरात एक चांगल्या प्रकारचे लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्याची महाराष्ट्र सरकारची योजना आहे. या योजनेचे ५० दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये सातारा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे हे सांगण्यास मला आनंद वाटतो. जेव्हा या योजनेतील शंभर दिवस पूर्ण होतील आणि सर्वांच्या कामकाजाचे मूल्यमापन होईल, तेव्हा सातारा जिल्हा पोलीस दल महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करेल असा विश्वास सुनील फुलारी यांनी यावेळी व्यक्त केला.पुसेगाव पोलीस स्टेशनचा आदर्श घ्यावा.

मला राष्ट्रपती पदक मिळाल्यानंतर  प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांची मान उंचावली आहे असे ही ते म्हणाले.कार्यक्रमास फलटण शहर, फलटण ग्रामीण, खंडाळा, लोणंद व शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, लायन्स क्लब, सेवाभावी संस्था, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी, सूत्रसंचलन प्रमोद रणवरे यांनी केले. आभार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी मानले.