Breaking

Wednesday, March 12, 2025

श्री क्षेत्र देहू येथे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळ्यात तैलचित्र अर्पण सोहळा संपन्न




पुणे प्रतिनिधी : रविंद्र मोडक

देहू, दि.10 मार्च 2025 रोजी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळ्या निमित्त देहू येथील भंडारा डोंगर पायथ्याशी अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.

  या पवित्र सोहळ्यात येलवाडी गावचे सुपुत्र श्री बबनराव नारायण जाधव सर (निवृत्त कला अध्यापक, रयत शिक्षण संस्था) यांच्या कलेतून साकारलेले संत तुकाराम महाराज व त्यांचे चौदा टाळकरी यांचे भव्य तैलचित्र आई वैकुंठवासी पार्वतीबाई आणि वडील वैकुंठवासी नारायण लक्ष्मण जाधव यांच्या स्मरणार्थ अर्पण करण्यात आले.त्रिशतकोत्तरी हरिनाम सप्ताहाचे आयोजक वारकरी रत्न हभप माऊली महाराज कदम (उर्फ छोटे माऊली) यांच्या हस्ते हे तैलचित्र भंडारा डोंगर देवस्थान कमिटीला आमलिका एकादशीच्या औचित्यावर अर्पण करण्यात आले.

या सोहळ्यात हभप माऊली महाराज यांनी श्री बी. एन. जाधव सरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.या प्रसंगी भंडारा डोंगर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष हभप श्री बाळासाहेब काशीद व श्री जगन्नाथ नाटक पाटील यांनी तैलचित्र स्विकारले. जाधव परिवाराकडून श्री विभास जाधव, सौ. मालन जाधव, श्री रुपेश जाधव, श्री धनंजय ढोरे, श्रीमती नलिनी ढोरे, श्री शरद सुर्यवंशी आदी उपस्थित होते.तसेच श्री क्षेत्र येलवाडी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते, त्यामध्ये ग्रामस्थ सरपंच व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड श्री रणजीत गाडे, माजी सरपंच श्री नितीन गाडे, माजी सरपंच श्री अशोक बोत्रे, भागिरथी माता देवस्थानचे अध्यक्ष श्री बाळासाहेब गाडे, सुरेश गाडे, रवि गायकवाड, प्रमोद गाडे, अक्षय गाडे, दिलीप बोत्रे, विश्वास गाडे, विठ्ठल बोत्रे, श्री भरतशेठ काळोखे यांचा समावेश होता.हडपसर वडकी गाव येथून उद्योजक श्री रविंद्र पवार, हभप श्री गुलाबभाऊ भिवाजी मोडक, माजी पोलीस निरीक्षक श्री विजय कामठे, हभप शंकर महाराज बोबडे, श्री हिरामण नागोजी मोडक, दादा चौधरी, श्री हण्णू जाधव आदी मान्यवरांनीही या उत्सवात सहभाग नोंदवला.या चैतन्यमय सोहळ्यामुळे भंडारा डोंगर आणि संपूर्ण देहू नगरी भक्ति रसात न्हाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.