मुख्य संपादक : संतोष पांढरे
निपुण महाराष्ट्र घडवण्यासाठी निपुण विद्यार्थी,निपुण शाळा, व निपुण समाजनिर्माण होण्यासाठी चावडी वाचन हा उपक्रम उपयुक्त आहे.
यामुळे विद्यार्थी धाडसी बनत आहेत. मला वाचायला येते मी ही सर्व लोकांच्या समोर वाचू शकतो ही भावना निर्माण होत आहे यामुळे विद्यार्थी पालक उत्साहीत होत आहेत. एक नवी उमेद व ऊर्जा यातून विद्यार्थ्यांना मिळत आहे. शैक्षणिक प्रक्रियेत ही ऊर्जा महत्वाची आहे यातून अपेक्षित गुणवत्ता साध्य करता येते. पाठ्यपुस्तका बरोबर च अवांतर पुस्तकांचे वाचन घेतल्यास मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण होईल आणि वाचन संस्कृती गतिमान होईल.
उपळाई बुद्रुक केंद्रातील सर्व शाळेत उपस्थित मान्यवर पालकांच्या समोर वाचून घेण्यात आले यासाठी आणखी पालकांनी पुढे यावे. गुणवत्ता वाढीसाठी पालकांनी मान्यवरांनी सूचना कराव्यात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे उपळाई केंद्रातील शिक्षकांचे मत आहे.




